ठाणे : रोज तेराशे ते दीड हजारावर संख्येने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मंगळवारी ठाणे जिल्ह्यात तब्बल चारशे ते पाचशेने घट झाली. मंगळवारी जिल्ह्यात ९४८ रुणांसह ३५ मृत्यूंची नोंद झाली. यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील रुग्णसंंख्या ९१ हजार १०२ झाली असून, मृतांची संख्या दोन हजार ५१६ वर गेली आहे.
ठाणे मनपा क्षेत्रात कोरोनाचे २१२ रुग्ण नव्याने आढळल्याने शहरात २० हजार १५१ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. तर आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे ६६५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केडीएमसी हद्दीत १५४ रुग्णांची वाढ झाली. तर, आठ जणांच्या मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २० हजार ६१ रुग्ण बाधित झाले आहेत.नवी मुंबई महापालिकेत २५३ रुग्णांची तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या १६, ६७९ झाली असून, मृतांची संख्या ४३७ वर गेली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात मंगळवारी तीन जणांचा मृत्यू झाला असून ४४ नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत मृतांची संख्या १३१ तर ६,९८८ बाधित रुग्णांची नोंद झाली. भिवंडी महापालिका क्षेत्रात १४ बाधित आढळले. तर तीन मृत्यूची नोंद करण्यात आली असून यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ६८५ झाली असून, मृतांची संख्या २०८ झाली आहे. मीरा भार्इंदरमध्ये ८८ रुग्णांसह एका मृत्यूची नोंद करण्यात आली. या शहरात आता बाधितांची संख्या आठ हजार ८२४ झाली तर मृतांची संख्या २८८ झाली.अंबरनाथमध्ये दोघांचा मृत्यू : अंबरनाथमध्य १२ रुग्णांसह दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या ३,९४९ झाली तर मृतांची संख्या १५८ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ६१ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या २,८०६ झाली आहे. या शहरात एकही मृत्यू झालेला नाही. येथे यापूर्वीची मृत्यूची संख्या ४८ आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ११० रुग्णांची वाढ झाली. यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ९५९ आणि मृतांची संख्या १७२ झाली आहे.