ठाणे : कोरोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण ठाण्यात वाढला असून आता रुग्णांची संख्या ही चार झाली आहे. तर गुरुवारी आढळलेल्या रुग्णांच्या घरामधील तीघांना कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्यात आता दिवसाला एक रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. तर शुक्रवारी दिवसभरात १२४ जणांची तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत १८०० जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत ४४ जणांना पाठविण्यात आले असून त्यातील ३० जणांना सोडण्यात आले असून उर्वरीत १५ जणांवर उपचार सुरु आहेत. तर १३ संशयींताचा यात समावेश आहे.
पहिला रुग्ण ठाण्यात आढळून आल्यानंतर आता ३९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर गुरुवारी त्यात आणखी एका रुग्णाची भर पडली होती. हा रुग्ण मुंबईतील खाजगी रुग्णालयात कामाला होता. त्याला त्याच रुग्णालयात २० मार्च रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु आता त्याच्या घरातील तीघांना ठाण्यातून कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यांचे रिपोर्ट तुर्तास प्राप्त झालेले नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यानंतर आता ठाण्यात शुक्रवारी आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्याच्या पासपोर्टवर ठाण्याचा पत्ता आहे. परंतु तो ठाण्यात आला नसून त्याला मुंबईतच रुग्णालयात थेट दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या चार झाली असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.दरम्यान आता पर्यंत पालिकेच्या माध्यमातून २७ मार्च पर्यंत १८०० जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ९२७ नागरीक हे परदेशातून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या ८७३ जणांचा त्यात समावेश आहे. तर आतापर्यंत १७५३ जणांना घरीच देखरेखाली ठेवण्यात आले आहे. तर ४४ जणांना कस्तुरबाला पाठविण्यात आले होते. त्यातील ३० जणांना तपासणी करुन घरी सोडण्यात आले आहे. तर उर्वरीत १५ जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील एकाचा रिपोर्ट हा पॉझीटीव्ह होता. तर अन्य ९ जण हे संशयीत आहेत. आता अन्य एकाचा रिपोर्ट हा पॉझीटीव्ह आला असून तो खाजगी रुग्णालयात उपाचार घेत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानंतर शुक्रवारी आणखी एका रुग्णाची भर पडली असून दोन रुग्ण हे खाजगीत तर दोन रुग्ण कस्तुरबामध्ये उपचार घेत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. तर पालिकेने तयार केलेल्या विलगीकरण कक्षात १० संशयीतांना देखरेखाली ठेवण्यात आले आहे.