लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्याने मंगळवारी नऊ हजारांचा टप्पा ओलांडला. मंगळवारी ३९७ नवे रुग्ण सापडले असून १३ जणांचा मृत्यू झाला. यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ हजार ६२ झाली असून मृतांची एकूण संख्या २८३ वर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्ण संख्या ही ठाण्यामध्ये १०४ इतकी असून शहरात सर्वात जास्त ४ जण दगावले आहेत. ठाणे ग्रामीण आणि उल्हासनगरमधील एकूण रुग्णांनी चारशेचा तर अंबरनाथ येथील एकूण रुग्णांनी दोनशेचा आकडा पार केला.
ठाणे महापालिका हद्दीत १०४ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णांचा आकडा तीन हजार ३०० वर गेला आहे. चौघांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ९५ वर गेली आहे. मंगळवारी ६५ जणांनी कोरोनावर मात केली. या खालोखाल नवी मुंबईत ९३रुग्णांचे निदान झाल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या दोन हजार ३७७ वर गेली आहे. कल्याण डोंबिवलीत नवीन ७१ रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
केडीएमसीतील एकूण रुग्णांची संख्या एक हजार १६६ इतकी झाली असून मृतांचा आकडा ३३ झाला आहे. ३४ नवीन रुग्ण हे ठाणे ग्रामीणमध्ये सापडल्याने एकूण रुग्णांचा आकडा ४०५ वर गेला आहे. तर एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. उल्हासनगर येथे नवे ३२ रुग्ण मिळाल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या ४१२ झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १२ इतका झाला आहे. मीरा-भार्इंदर, अंबरनाथ आणि भिवंडीत प्रत्येकी २० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तेथील अनुक्रमे एकूण रुग्ण संख्या ७७७ व २०८ आणि १८५ इतकी झाली आहे.
मीरा-भार्इंदर तेथे दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ३३ इतकी झाली आहे. बदलापूर येथे सर्वात कमी नवीन ३ रुग्ण सापडल्याने एकूण रुग्ण संख्या २३२ वर पोहोचल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.