ठाणे : ठाण्यात बोगस लस घेण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न जिल्हा शासकीय रुग्णालयात घडला असून, लसीकरण केंद्रावर बोगस लसीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुकलीस दक्ष परिचारिकेच्या सतर्कतेमुळे लस घेता आली नाही.
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत असते. तसेच या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना काही वेळेस पाचारण करावे लागते. गुरुवारी बोगस लसीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची बाब उघडकीस आली. दोघांनी रुग्णालयाच्या नावाचे बनावट केसपेपर तयार करून त्यावर रुग्णालयाचा बनावट शिक्का आणि स्वाक्षरी करून लस घेण्यासाठी आले होते. लसीकरण करणाऱ्या परिचारिका शलाका पावसकर यांनी त्यांचे केसपेपर तपासले असता ते बनावट असल्याचे आढळून आले. यानंतर, रुग्णालय प्रशासनाने त्या दोघांची चौकशी केली असता त्यांनी हे केसपेपर बनावट असल्याची कबुली दिली. प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने ठाणे पोलिसांना सखोल चौकशी करण्याचे पत्र दिले. पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
........
वाचली.