शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
2
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
3
"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला
4
Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?
5
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
6
Haryana Assembly Election Results 2024 : बाजी हातातून निसटताना भाजपाने केली खेळी; हरयाणात या समि‍करणामुळे झाली उलथापालथ
7
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचा अंतिम निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
8
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...
9
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'
10
हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
11
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!
12
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
13
SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या
14
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
15
जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले
16
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
17
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
18
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
19
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
20
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी

Jitendra Awhad: 'ओबीसींवर माझा विश्वास नाही, ते आरक्षणाच्या लढ्यात मैदानात नव्हते'; जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2022 11:42 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या एका वक्तव्यानं नव्या वादाला फुटण्याची शक्यता आहे.

ठाणे-

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या एका वक्तव्यानं नव्या वादाला फुटण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात आरक्षणाबाबत बोलत असताना ओबीसी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला आहे. ओबीसींवर माझा विश्वासच नाही. कारण आरक्षणाच्या मागणीसाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला फक्त महरा आणि दलित समाज होता, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. 

ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानं विरोधक आता आक्रमक झाले आहेत. 

"खरं तर ओबीसींवर माझा फारसा विश्वास नाही. आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. लढायला फक्त महार आणि दलित समाज होता. कारण ओबीसींना लढायचं नव्हतं. ओबीसींवर ब्राह्मणवादाचा पगडा इतका आहे की आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहित नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला देवळात सुद्धा येत देत नसतं. ते हे सर्व विसरले आणि आता आरक्षणासाठी पुढे येत आहेत. नुसतं घरात बसून व्हॉट्सअॅप करुन चालणार नाही. रस्त्यावर यावं लागणार आहे. केंद्र सरकारशी दोन हात करावे लागणार आहेत", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

आव्हाडांच्या या वक्तव्यावर आता भाजपा नेते चंद्रशेखर बावळकुठे आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड नेहमीच आपल्या विधानांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करत असतात. महराष्ट्रात सगळ्या समाजात एकवाक्यता आहे. अशात ओबीसींना ज्या प्रकारे हिनवण्याचा प्रकार आव्हाड यांनी केला आहे तो अतिशय निंदनीय आहे. ओबीसी समाज त्यांना कधी माफ करणार नाही. यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे पाहावं लागेल. त्यांनी अजून डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही, असा इशाराच बावनकुळे यांनी आव्हाड यांना दिला आहे. तसंच आव्हाड यांनी केलेल्या विधानाबाबत ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणी देखील बावनकुळे यांनी केली आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षण