शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

पकडल्यानंतरही अधिकारी मलईदार पदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:40 PM

मीरा-भाईंदर महापालिकेतील लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी लांबलचक आहे. लाच घेताना पकडले गेल्यानंतरही हे अधिकारी वजनदार नेते तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हितसंबंधांचा वापर करून पुन्हा मलाईदार पदांवर बसतात.

- धीरज परबमीरा-भाईंदर महापालिकेतील लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी लांबलचक आहे. लाच घेताना पकडले गेल्यानंतरही हे अधिकारी वजनदार नेते तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हितसंबंधांचा वापर करून पुन्हा मलाईदार पदांवर बसतात. पुन्हा महत्त्वाच्या पदावर बसवल्यानंतर अनेक तक्रारी होऊनही राजकीय वरदहस्तामुळे प्रशासनाकडून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही लाचखोरांना अकार्यकारी पदावर नियुक्त करा, अशी खानापूर्ती केली जाते. गेल्या १८ वर्षांत १९ पालिका अधिकारी, कर्मचारी लाचखोरीच्या गुन्ह्यात सापडले आहेत.चंद्रकांत बोरसे, संजय दोंदे, सुनील यादव, दिलीप जगदाळे, डॉ. रुंदन राठोड, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. संजीवकुमार गायकवाड, प्रशांत जानकर, नितीन राठोड या अधिकाºयांसह उपशिक्षक अनिल आगळे, बालवाडी शिक्षिका अलका पाटील, लिपिक आनंद गबाळे, दशरथ हंडोरे, गणेश गोडगे, महादेव बंदिछोडे, प्रशांत कोळी, राकेश त्रिभुवन, कुंदन पाटील, योगेश शिंदे अशी लाचखोरांची यादी मोठी आहे. पण, आजपर्यंत एकाही लाचखोरास शिक्षा झालेली नाही. लाच घेताना पकडलेले नगरसेवक नरेंद्र मेहता, वर्षा भानुशाली, वंदना चक्रे, अशोक तिवारी, सॅण्ड्रा रॉड्रिक्स, कमलेश भोईर अशी यादी आहे. यातील मेहता, भानुशाली, तिवारी यांना तर नंतर मोठमोठी पदं मिळाली.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग