शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अधिकारी निलंबनाचा ठराव बेकायदा , मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 6:12 AM

केडीएमसीच्या महासभेने अतिरिक्त आयुक्त ते प्रभाग अधिकारी यांच्या निलंबनाचा ठराव मार्चमध्ये मंजूर केला आहे. मात्र, महासभेचा हा ठरावच अशासकीय व बेकायदा आहे, अशी तक्रार माहिती अधिकाराचे कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे केली आहे.

कल्याण - केडीएमसीच्या महासभेने अतिरिक्त आयुक्त ते प्रभाग अधिकारी यांच्या निलंबनाचा ठराव मार्चमध्ये मंजूर केला आहे. मात्र, महासभेचा हा ठरावच अशासकीय व बेकायदा आहे, अशी तक्रार माहिती अधिकाराचे कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे केली आहे.डोंबिवलीतील टी.के. ढाबा कारवाईप्रकरणी प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांच्या गाडीचा पाठलाग करून बेकायदा बांधकामाविरोधातील कारवाईत अडथळा आणला, तसेच त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे व भाजपा नगरसेवक शैलेश धात्रक यांच्याविरोधात मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर, हळबे यांनी बेकायदा बांधकामास अतिरिक्त आयुक्त संजय घरत जबाबदार असल्याचा आरोप केला. त्यामुळे घरत यांनी मानहानीप्रकरणी हळबे यांना कायदेशीर नोटीस पाठवली. या नोटिशीला हळबे यांनी अजूनही प्रत्युत्तर दिलेले नाही.दरम्यान, १९ मार्चला महापालिकेच्या महासभेत सभा तहकुबीची सूचना बेकायदा बांधकामप्रकरणी चार सदस्यांनी मांडली. त्यावर चर्चा होऊन महासभेने बेकायदा बांधकामप्रकरणी घरत, उपायुक्त सुरेश पवार व प्रभाग अधिकारी भांगरे यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी. त्यात दोषी आढळल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा ठराव मंजूर केला. मात्र, हा ठरावच अशासकीय व बेकायदा आहे, अशी तक्रार गोखले यांनी सरकारदरबारी केली आहे.राज्य सरकारने घरत यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात निलंबनाचा ठराव महासभेने केला असला, तरी तो अशासकीय आहे. घरत यांच्याविरोधात कार्यवाहीचा अधिकार हा नगरविकास खात्याला आहे. दुसरीकडे पवार व भांगरे हे चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. परंतु, चौकशीपूर्वीच त्यांचे निलंबन करणे, हे नैसर्गिक न्यायाला धरून नाही. भांगरे यांच्याबाबत घडलेल्या प्रकारानंतर, आपले सदस्यत्व रद्द होऊ शकते, या भीतीपोटी नगरसेवकांनी तिन्ही अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाचा ठराव मंजूर केला.हळबे, धात्रक यांचे पद रद्द करण्याचा प्रस्तावराज्य सरकारने या प्रकरणात आयुक्तांकडे अहवाल मागवला होता. त्यामुळे आयुक्तांनी तिन्ही अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याचा खुलासा त्यांनी आयुक्तांकडे केला आहे. दरम्यान, विविध विभागांचा अभिप्राय तसेच विधी विभागाच्या शिफारशीनुसार प्रशासनाने हळबे व धात्रक यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली आहे. आयुक्तांनी या दोन्ही सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची नोटीस बजावली आहे का, असा सवाल केला जात आहे.भांगरे यांनी मानपाडा पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, धात्रक व हळबे यांनी टी.के. ढाबा कारवाईप्रकरणी त्यांचा पाठलाग केला. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून कारवाईत व्यत्यय निर्माण केला. महापालिका अधिनियम १० (१ ड) नुसार दोन्ही नगरसेवक आपल्या पदावर राहण्यास अपात्र ठरतात. त्या अधिनियमान्वये प्रशासनाने विधी विभागाचा अभिप्राय घेऊन आयुक्तांकडे पद रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे.अन्य प्रकरणांत नगरसेवकांचे मौनमहापालिकेच्या महासभेत यापूर्वीही लेखा अधिकारी दिग्विजय चव्हाण, उपायुक्त दीपक पाटील, धनाजी तोरस्कर व प्रभाग अधिकारी अमित पंडित यांना सरकारदरबारी परत पाठवण्याचे ठराव केले. त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. छत कोसळल्याचा अहवाल घरत यांनी तयार केला होता. या प्रकरणात दोषींवर कारवाईचा पत्ता नाही. बीओटी प्रकल्पातील भ्रष्टाचारातील दोषींवर कारवाईप्रकरणी नगरसेवकांनी मौन बागळले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेत घरत यांना स्वारस्यसरकारने घरत यांची २ जून २०१५ ला अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यांनी ३ तारखेला पदभार घेतला. त्याला यंदाच्या जूनमध्ये तीन वर्षे होतील. या पदावरील अधिकाºयांची तीन वर्षांनंतर बदली होते. त्यामुळे त्यांची बदलीची नेहमीच चर्चा होते. मध्यंतरी त्यांची बदली पनवेल महापालिकेत होईल, असा अंदाज व्यक्त होत होता. दरम्यान, आपण ठाणे व नवी मुंबई महापालिकेत काम करण्यास इच्छुक असल्याचे सांगणाºया घरत यांनी मात्र स्वत: नगरविकास खात्याकडे अर्ज करून पिंपरी-चिंचवड महापालिकेत बदली द्यावी, अशी मागणी केली आहे. सध्या हा अर्ज सरकारच्या विचाराधीन आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाChief Ministerमुख्यमंत्री