ठाणे : निवडणूक होत असलेल्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघात १८ विधानसभांचा समावेश आहे. यातील सहा हजार ४८८ मतदार केंद्र आहेत. या केंद्रांवर मतदानाच्या दिवशी कर्तव्य बजावणारे अधिकारी, कर्मचारी आदींच्या विधानसभा निश्चित करून तेथे हजर होण्याचे आदेश संबंधीताना देण्यात आले. सोमवारी गडकरी रंगायतन येथे जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हे आदेश जारी केले आहेत.जिल्हह्यातील या तिन्ही लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्याभरात सहा हजार ४८८ मतदान केंद्र निश्चित केले आहेत. पुरवणी यादीतील मतदारसंख्येस अनुसरून सहाय्यकारी मतदान केंद्र लवकरच निश्चित होणार आहे. सध्या निश्चित केलेले ६०लाख ९४ हजार ३०८ मतदार १८ विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांवर मतदान करणार आहे. त्यासाठीचे अधिकारी, कर्मचारी आदी मनुष्यबळ निश्चित करण्यात आले असून त्यांना त्यांची विधानसभा देऊन तेथील कार्यालयात हजर होण्याचे आदेश येथील गडकरी रंगायतनमध्ये आज देण्यात आहे.मतदान केंद्रांवर कर्तव्य बजावणारे अधिकारी, कर्मचा-यांना आजच्या आदेशानुसार त्यांच्या विधानसभा कार्यालयात मंगळवारी १६ एप्रिल रोजी उपस्थित राहण्याचे सूचित केले. यानंतर या कर्मचा-यांचे १७ ते २० एप्रिल या कालावधीत त्या त्या विधानसभा कार्यालयाव्दारे मतदान मशीन, व्हीव्ही पॅड आदी मशीन हाताळण्याचे खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभांच्या कार्यालयांव्दारे त्यांच्या नियंत्रणातील अधिकारी कर्मचाºयांना चार दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार ांहे. या प्रशिक्षणाव्दारे संबंधीताना मतदान केंद्रांवरील कामाची इतंभूत माहिती दिली जाणार आहे.
निवडणूक कामकाजासाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांना मिळाली विधानसभा; हजर होण्याचे आदेश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 6:58 PM
ठाणे : निवडणूक होत असलेल्या ठाणे , कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघात १८ विधानसभांचा समावेश आहे. यातील ...
ठळक मुद्देजिल्हह्यातील या तिन्ही लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिल रोजी मतदान विधानसभा कार्यालयात मंगळवारी १६ एप्रिल रोजी उपस्थित राहण्याचे सूचित मतदान मशीन, व्हीव्ही पॅड आदी मशीन हाताळण्याचे खास प्रशिक्षण