शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

डॉक्टरांसह अधिकारी - कर्मचाऱ्यांची ठाणे येथे ‘ रक्तदान ’ जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 4:05 PM

येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या श्री हरीश श्रीरामजी बागडे ,वैज्ञानिक अधिकारी रक्त पेढी विभागाच्या वतीने रक्तदान जनजागृती रॅली काढण्यात आली. सकाळी काढण्यात आलेली ही रॅली जीपीओ मार्गे, सेंट्रल मैदान, शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कोर्ट नाका, सुभाष पथ, जांभळी नाका, टॉवर नाका, चिंतामणी चौक, अग्यारी लेन, टेंभी नाका, जैन मंदिर मार्गे पुन्हा सिव्हील रूग्णालयात

ठळक मुद्दे जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या श्री हरीश श्रीरामजी बागडे ,वैज्ञानिक अधिकारी रक्त पेढी विभागाच्या वतीने रक्तदान जनजागृती रॅली डॉक्टरांसह, परिचारिका, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनी आणि रूग्णालयाचे अधिकारी, कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने सहभागरक्तपेढीतील रक्त साठा मोठ्याप्रमाणात वाढण्यात मदत व्हावी, यासाठी रक्तदात्यांनी स्वत: पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन

ठाणे : अपघातग्रस्तांसह विविध प्रकारच्या शस्त्रक्रियानंतर रूग्णाना जीवदान देणा-या रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे, रक्तदान करणा-यांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी येथील सिव्हील रूग्णालयापासून रक्तदान जनजागृती रॅली सोमवारी सकाळी काढण्यात आली. यामध्ये डॉक्टरांसह, परिचारिका, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनी आणि रूग्णालयाचे अधिकारी, कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या श्री हरीश श्रीरामजी बागडे ,वैज्ञानिक अधिकारी रक्त पेढी विभागाच्या वतीने रक्तदान जनजागृती रॅली काढण्यात आली. सकाळी काढण्यात आलेली ही रॅली जीपीओ मार्गे, सेंट्रल मैदान, शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कोर्ट नाका, सुभाष पथ, जांभळी नाका, टॉवर नाका, चिंतामणी चौक, अग्यारी लेन, टेंभी नाका, जैन मंदिर मार्गे पुन्हा सिव्हील रूग्णालयात येथे येऊन थांबली. यानंतरही रूग्णालय प्रांगणात डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.सुमारे १०० ते १५० जणांच्या या रॅलीसाठी पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवून वाहतुकीस अडथळा येणार नाही, याची देखील खबरदारी घेतली. या वेळी रक्तदान - जीवदान अशा आशयाचे विविध पोस्टर, बॅनर घेऊन रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहीत करणा-या घोषणा देत या रॅलीने ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात फिरून जनजागृती केली. रक्तपेढीतील रक्त साठा मोठ्याप्रमाणात वाढण्यात मदत व्हावी, यासाठी रक्तदात्यांनी स्वत: पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन या रॅलीव्दारे करण्यात आले. यावेळी रक्तदानाचे महत्व पटवून देणा-या घोषणा देत निघालेल्या डॉक्टरांची या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यामुळे रक्तदान करणा-या रक्तदात्यांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटल