शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचे सूत्रधार पोलिसांच्या रडारवर, २६ सिम बॉक्स मशिन्स हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:42 PM

भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज प्रकरणात वसीम शेख, शाह आलम आणि कबीर हे तिघे जण गुन्हे अन्वेषण विभागाच्या रडारवर आहेत.

 - जितेंद्र कालेकर 

ठाणे-  भिवंडीतील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज प्रकरणात वसीम शेख, शाह आलम आणि कबीर हे तिघे जण गुन्हे अन्वेषण विभागाच्या रडारवर आहेत. वसीम हा आंतरराष्ट्रीय कॉलसाठी १४ ते १६ पैसे प्रति मिनिटप्रमाणे कॉलची विक्री करायचा. यातूनच एका गेटवे (सिम बॉक्स मशिन) मधून महिना ६० ते ७० हजार रुपयांची कमाई केली जायची. अशा २६ मशिन्स गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने हस्तगत केल्या आहेत.भिवंडी परिसरात अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज सुरू करून परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल हे अनधिकृत सीम बॉक्सचा वापर करून, त्यामध्ये भारतीय कंपनीच्या सिम कार्डस्चा वापर करून भारतातील इच्छित मोबाइल क्रमांकावर कॉल केले जात होते. ही माहिती मिळाल्यानंतर भिवंडी युनिटचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील आणि संदीप निगडे यांच्या पथकाने १० आॅक्टोबरच्या पहाटे १५ ठिकाणी धाडी टाकून दहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून आतापर्यंत २६ सिम बॉक्ससह सुमारे २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेतील टोळीकडून पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, सहायक पोलीस आयुक्त मुकूंद हातोटे, निरीक्षक शीतल राऊत आदी अधिकाºयांनी गेल्या १२ दिवसांमध्ये कसून चौकशी केली. मनोजकुमार एटीएसकडून जेरबंदभिवंडी अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजशी संबंधित असलेल्या मनोजकुमार सैनी याची माहिती अटकेतील आरोपींकडून मिळाल्यानंतर भिवंडी युनिटचे अधिकारी राजस्थानमध्ये गेले होते. मात्र, तत्पूर्वीच १३ आॅक्टोबरला राजस्थान दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) त्याला अटक केल्याची माहिती या पथकाला मिळाली. वसीमने नवलगड (राजस्थान) येथे मनोजकुमारकडे सिम बॉक्सची विक्री केली होती. वसीममार्फतच राजस्थान आणि भिवंडीतही हे टेलिफोन एक्सचेंज चालविले जात होते. दिवसाला ४ हजार रुपये कमिशनवसीम आणि त्याची टोळी भिवंडीतील वेगवेगळया अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजला गेटवे मशिन्स पुरावित होते. त्यातून एका कॉलिंगला प्रतिमिनिट १४ ते १६ पैसे असे दिवसाला सुमारे चार हजार रुपये कमिशन त्याला मिळत होते. साधारण, एका सिम बॉक्स मशिनमागे किमान ७० ते ७५ हजार रुपये प्रतिमहिना त्याची कमाई होत होती. अशा २६ मशिन्स आतापर्यत पोलिसांनी जप्त केल्या आहेत. म्हणजे ही कमाई निव्वळ १८ ते २० लाखांमध्ये जात होती. त्यातून आंतरराष्ट्रीय कॉल्स प्रथमदर्शनी दिसत नसल्यामुळे केंद्राचा करोडो रुपयांचा महसूल यातून बुडत होता. शिवाय, खंडणी किंवा देशविघातक कृत्यांसाठीही या राऊटर्सचा (कॉल वळविणे) वापर होत असल्याची शक्यता आहे. त्यातील अंबरनाथच्या एका प्रकरणात खंडणीसाठी कॉल गेल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. अंबरनाथच्या एका व्यापा-याला खंडणीसाठी कॉल येत होते. हे कॉल ओडीसातून येत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. त्यानुसार उल्हासनगर पोलीस ओडीसाला गेले. हा कॉल आंतरराष्ट्रीय असून तो भिवंडीच्याच अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजमधून राऊट केल्याची माहिती समोर आली. त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी भंडाफोड केला. राऊटर कॉलचा उपयोग कोणासाठीअधिकृत टेलिफोन एक्सचेंजद्वारे आंतरराष्ट्रीय फोन केल्यानंतर त्याचा प्रतिमिनिट आठ ते नऊ रुपये प्रमाणे दर आकारला जातो. भारतातून सौदी अरेबिया, अमेरिका, दुबई या देशांमध्ये नोकरी व्यावसायानिमित्त जे लोक बाहेर गेले आहेत, त्यांना फ्री कॉलींगच्या नावाखाली अशा राउटर कॉलचे कार्डस महिना ३०० ते ४०० रुपयांना विकले जातात. याच कार्डच्या आधारे हे अनिवासी भारतीय नागरिक भारतात फोन करून स्वस्तात फोन करण्यासाठी त्याचा वापर करतात. यातून सरकारचेही उत्पन्न बुडते आणि असे अनधिकृत एक्सचेंज चालविणा-यांकडेही रग्गड पैसा जमा होतो. त्यातूनच देशविघातक कारवायांसाठी देखिल अशाच एक्सचेंजचा वापर केला जाण्याची भीती वर्तविली जात आहे. एका बॉक्समध्ये ३२ कार्डसएका गेटवे (सिम बॉक्स मशिन) मध्ये ३२ सिम कार्ड बसविली जातात. एखाद्याने फोन केल्यानंतर तो प्रथम या गेटवेमध्ये येतो. त्यानंतर तो गेटवेतील सिममधून संबंधितांच्या फोनला जोडला जातो. मुळत: आंतरराष्ट्रीय असलेला हा कॉल गेटवेमुळे स्थानिक कॉलमध्ये रुपांतरीत होतो. एक्सचेंज चालविणारा इंटरनेटचे वर्षाला केवळ दोन ते तीन हजार रुपये मोजतो. तर एका सिम कार्डमागे ७०० ते ८०० रुपयांचा खर्च करतो. त्यातून मात्र लाखो रुपयांची ‘मलई’ या एक्सचेंजमधून ही टोळी उकळत होती, असेही आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. यात वसीम शेखसह आठ जणांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती एका वरीष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ला दिली.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेPoliceपोलिस