लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मोटारसायकलच्या धडकेत पायी रस्ता ओलांडणारे आजोबा शंकर चंद्रा सिंग (६८) हे गंभीर जखमी झाल्याची घटना एसजीएस कंपनीसमोरील रोड क्रमांक १६ येथे २६ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात मोटारसायकल स्वाराविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वागळे इस्टेट, शिवशक्तीनगर येथील पाईपलाईन जवळ राहणारे शेखर सिंग यांचे आजोबा शंकर सिंग हे वागळे इस्टेट रोड क्रमांक १६ हा रस्ता २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ओलांडत होते. त्याचवेळी भरघाव वेगाने आलेल्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या अपघातामध्ये त्यांच्या उजव्या पायाच्या घुटन्याजवळ फ्रॅक्चर झाले. तसेच कमरेच्या डाव्या बाजूला मार लागून ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर मोटारसायकल स्वाराने शंकर सिंग यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता तिथून पलायन केले. याप्रकरणी सिंग यांनी २९ नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार व्ही. जे. सावंत हे अधिक तपास करीत आहेत.
ठाण्यात दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 5:36 PM
मोटारसायकलच्या धडकेत पायी रस्ता ओलांडणारे आजोबा शंकर चंद्रा सिंग (६८) हे गंभीर जखमी झाल्याची घटना एसजीएस कंपनीसमोरील रोड क्रमांक १६ येथे २६ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
ठळक मुद्दे श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा अपघातानंतर दुचाकीस्वाराचे पलायन