ठाणे : ब्रिटिश राजवटीत बांधलेला कल्याण येथील पूर्व - पश्चिमेस जोडणारा जुना पत्री पूल पादचाऱ्यांसह सर्व प्रकारच्या वाहनांना ये - जा करण्यास कायमचा बंद करण्यात आला. यासाठीची ठाणे शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी शनिवारी अधिसूचना काढली आहे. या पुलावरील वाहतूक नव्या पुलावरून वळवण्यात आली आहे.कल्याण पूर्व कोळसेवाडी सूचक नाका येथील पत्रीपुलावरून गोविंदवाडी बायपास दुर्गाडीच्या दिशेने जाणाऱ्यां तसेच दुर्गाडीकडून सूचक नाक्याकडे येणाऱ्यां सर्व प्रकारच्या वाहनांना व पादचाऱ्यांना जुना पत्री पूल बंद करण्यात आला आहे. ही सर्व वाहतूक आता नवीन पत्री पुलावरून होईल. जड - अवजड वाहनांची वाहतूक ही नवीन पत्री पुलावरून तेही रात्री ११ ते पहाटे ५ वाजेच्या कालावधीतच सुरू ठेवली जाणार आहे.मध्य रेल्वे आणि राज्य रस्ते विकास महामंडळाने ब्रिटीश कालीन जुना पत्री पूल सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्णत: बंद करावा अशी सुचना जारी केली होती. पण यापूर्वी जुना पत्री पूल हा हलक्या वाहनांसाठी सुरु ठेवण्याची परवानगी होती. तसी अधिसूचना जुलैमध्ये वाहतूक विभागाने काढली होती. परंतु, आता सुरक्षिततेच्या कारणास्तव व खबरदारीची उपाययोजना म्हणून या जुन्या पत्री पुलावरील संपूर्ण वाहतूकच बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठीची अधिसूचना ठाणे शहर वाहतूक विभागाने आज जारी केली. यामुळे ब्रिटीश कालापासून सुरू असलेली व मध्यंतरी काही दिवस बंद केलेली वाहतूक आता अनिश्चित कालावधीसाठी कायमची बंद केल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
ब्रिटीश कालीन कल्याणचा जुना पत्री पूल सर्व वाहनांसह पादचाऱ्यांसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 4:28 PM
कल्याण पूर्व कोळसेवाडी सूचक नाका येथील पत्रीपुलावरून गोविंदवाडी बायपास दुर्गाडीच्या दिशेने जाणाऱ्यां तसेच दुर्गाडीकडून सूचक नाक्याकडे येणाऱ्यां सर्व प्रकारच्या वाहनांना व पादचाऱ्यांना जुना पत्री पूल बंद करण्यात आला आहे. ही सर्व वाहतूक आता नवीन पत्री पुलावरून होईल. जड - अवजड वाहनांची वाहतूक ही नवीन पत्री पुलावरून तेही रात्री ११ ते पहाटे ५ वाजेच्या कालावधीतच
ठळक मुद्देब्रिटिश राजवटीत बांधलेला कल्याण येथील पूर्व - पश्चिमेस जोडणारा जुना पत्री पूलसर्व प्रकारच्या वाहनांना ये - जा करण्यास कायमचा बंदजड - अवजड वाहनांची वाहतूक ही नवीन पत्री पुलावरून तेही रात्री ११ ते पहाटे ५ वाजेच्या कालावधीतच