उल्हासनगर : महापालिकेने २९ सप्टेंबर रोजी पाच मजली बालाजी अपार्टमेंटला नोटीस बजावून जबरदस्तीने नागरिकांना इमारत रिकामी करण्यास सांगितले. तसेच पोलीस व पालिका अधिकाऱ्यांनी पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी दिल्याचा आरोप इमारतीमध्ये राहणाºया सीमा शिर्के यांनी केला. इमारतीबाबतचे जुने रेकॉर्ड महापालिकेकडे नाही, असेही त्यांनी सांगितले.
इमारत अतिधोकादायक व बेकायदा असेल, तर इमारतीवरील मोबाइल टॉवर कसा काय अधिकृत होतो, असा प्रश्नही त्यांनी केला. महापालिकेला नागरिकांची काळजी असेल, तर इमारत जमीनदोस्त करण्यापूर्वी पुनर्बांधणीचा प्रश्न आधी सोडवावा, असेही शिर्के म्हणाल्या....तर हक्काची जागाका सोडावी?महापालिकेने गेल्या आठवड्यात २६ अतिधोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली. तसेच सर्वच इमारती रिकाम्या असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात अनेक इमारतींमध्ये नागरिक राहत आहेत. नागरिक राहत असताना अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्याची घाई महापालिकेला का? असा प्रश्न निर्माण झाला. अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून कारवाई केली. त्यापैकी किती इमारतींची पुनर्बांधणी झाली. बेघर झालेल्या नागरिकांचे काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. इमारतीची पुनर्बांधणी होत नसेल, तर नागरिकांनी हक्काची जागा का सोडावी, असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून याविरोधात मनसे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिला.