शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Raj Thackeray Exclusive Interview: ...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरेंची पहिलीवहिली राजकीय मुलाखत
2
वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी?
3
"अभिजीत बिचुकले स्वयंभू, जनतेनं आता..."; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रराजेंविरोधात लढणार
4
PAK vs ENG : फिरकीच्या तालावर पाहुण्यांना नाचवले; फायनल कसोटीतही पाकिस्तानच्या 'गब्बर'ची कमाल
5
Maharashtra Assembly election 2024: महायुतीत पहिली बंडखोरी! आभा पांडे यांनी पुर्व नागपुरातून भरला अर्ज
6
Video - मित्रांसोबत हसत-खेळत गप्पा मारताना 'तो' खाली कोसळला; कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला 'मृत्यू'
7
NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा
8
माधुरी दीक्षित-विद्या बालनच्या नृत्याचा नजराणा! 'भूल भूलैय्या ३'मधील 'आमी जे तोमार' गाण्याची झलक
9
Vidhan Sabha Election 2024: लोकसभेला बसला फटका; आता 'तुतारी'चा वेगळ्या पद्धतीने प्रचार
10
धुळे शहर विधानसभेसाठी ठाकरेंचा शिलेदार ठरला, बड्या नेत्यानं शिवबंधन बांधत भगवा उचलला!
11
महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...
12
शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा
13
भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल
14
ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले
15
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
17
बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट
18
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
20
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

वाडा तहसीलकडून वृद्धांची ससेहोलपट

By admin | Published: August 13, 2016 3:51 AM

तालुक्यातील असंख्य वृद्ध नागरिक, विधवा व निराधार महिला यांना विविध योजनेंंतर्गत मानधन दिले जाते. सध्या संबंधित व्यक्ती हयात आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी वृद्ध नागरिकांना

वाडा : तालुक्यातील असंख्य वृद्ध नागरिक, विधवा व निराधार महिला यांना विविध योजनेंंतर्गत मानधन दिले जाते. सध्या संबंधित व्यक्ती हयात आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी वृद्ध नागरिकांना थेट तहसील कार्यालयात बोलावले जात असल्याने त्याचा त्रास वृध्द नागरिकांसह विधवा महिलांना होत असल्याने विविध संघटनांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यातील असंख्य नागरिकांना वृद्धापकाळ योजनेंतर्गत सहाशे रु पये मानधन दर महिन्याला दिले जाते. तसेच निराधार व विधवा महिलांनाही याच प्रकारचे मानधन संजय गांधी निराधार योजनेतून दिले जाते. या योजनेतील लाभार्थी आता हयात आहेत की नाही, पाहण्याचे काम सुरू आहे. तसेच त्यांच्या प्रकरणाला आधारकार्ड नंबर जोडण्याचे काम सुरू केले. यासाठी लाभार्थ्यांना ग्रामपंचायतीकडून हयात असल्याचा दाखला घेतला जातो. त्याशिवाय ते प्रकरण ग्राह्य धरले जात नाही. असे असतानाही वाडा तहसीलच्या संजय गांधी शाखेकडून लाभार्थ्यांना थेट तहसीलदार कार्यालयात बोलावून घेतले जाते. व तो हयात असल्याबाबत शहानिशा केली जात आहे. गुरुवारी दि.११ रोजी वाडा तालुक्यातील घोडसाखरे येथील वयोवृद्ध नागरिक धर्मा बेंडू दुधवडे यांना त्यांच्या नातेवाईकांनी तहसील कार्यालयात आणले होते. विशेष म्हणजे १०५ वर्षे वय असलेल्या या वयोवृद्धाला नीट चालताही येत नव्हते. (वार्ताहर)- यासंदर्भात वाड्याचे नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता, यापुढे वयोवृद्धांना तहसीलदार कार्यालयात न बोलवता आमचे तलाठीच गावात जाऊन माहिती घेतील, असे त्यांनी सांगितले.