शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ओमी टीमची मनधरणी

By admin | Published: June 23, 2017 5:51 AM

महापालिका प्रभाग समिती सभापतीवरून ओमी टीम व भाजपातील वाद चव्हाटयावर आला. मात्र भाजपाला टीमची मनधरणी करण्यात यश आले असून भाजपा व ओमी टीममध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती सभापतीवरून ओमी टीम व भाजपातील वाद चव्हाटयावर आला. मात्र भाजपाला टीमची मनधरणी करण्यात यश आले असून भाजपा व ओमी टीममध्ये आलबेल असल्याची प्रतिक्रीया शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दिली. तर शिवसेना व ओमी टीममध्ये निवडणुकीपूर्वी बैठक होण्याचे संकेत शिवसेना शहरप्रमुखांनी दिले आहेत. दरम्यान, उद्या प्रभाग आणि विशेष समिती सभापतीपदाची निवडणूक होत आहे.उल्हासनगर महापालिकेवर ओमी टीमच्या मदतीने महापौर निवडून आणण्यात भाजपाला यश आले. यासाठी भाजपाने साई पक्षाची मदत घेतली. पाठिंब्याच्या बदल्यात साई पक्षाला उपमहापौर व स्थायी समिती सभापतीपद दिले. मात्र ज्यांच्यामुळे भाजपाचा झेंडा पालिकेवर फडकला त्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची चर्चा सुरू झाली. ओमी टीमने नगरसेविका शुभांगिनी निकम यांच्यासाठी प्रभाग समिती क्रमांक - ३ चे सभापतीपद भाजपा वरिष्ठांकडे मागितले. मात्र आघाडीतील करारानुसार साई पक्षाला पहिल्या वर्षीचे सभापतीपद देण्याचा शब्द राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला. त्यानुसार साई पक्षाचे अजित गुप्ता यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे.भाजपातील ३२ पैकी २१ नगरसेवक ओमी टीमचे आहेत. असे असताना एकही प्रभाग समिती सभापतीपद मिळत नसल्याचा राग ओमी टीमला आला. त्यांनी शिवसेनेसोबत घरोबा करून सभापतीपदासाठी बोलणी सुरू केली. यामुळे भाजपाचे धाबे दणाणले. त्यांनी टीमला सव्वा वर्षानंतर महापौरपदासह दोन प्रभाग समिती सभापतीपद करारात दिल्याची आठवण करून दिली. राज्यमंत्री चव्हाण यांनी मध्यस्थामार्फत व स्वत: ओमी कलानी यांच्याशी चर्चा केली. अखेर टीमची करण्यात मनधरणीत भाजपाला यश आले. मात्र टीमचे समर्थक याबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत.शुक्रवारी प्रभाग समिती सभापती पदासह नऊ विशेष समिती सभापतीपदाची निवडणूक आहे. चारपैकी दोन समिती सभापती पद साई पक्ष तर एक सभापतीपद भाजपाला मिळणार आहे. प्रभाग समिती ४ चे सभापतीपद शिवसेना समर्थक राष्ट्रवादी पक्षाचे भरत गंगोत्री यांच्याकडे जाणार आहे. तसेच ९ पैकी तब्बल ६ विशेष समिती सभापतीपद ओमी टीमला देण्याचे आश्वासन देत इतर तीन पदे साई पक्षाला दिली आहेत.