शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

Omicron: विलगीकरणातील रुग्णांच्या देवदर्शनाने ओमायक्रॉनचा ‘प्रसाद’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 7:08 AM

उल्हासनगर पालिकेची कारवाई : दोघांविरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : केनियावरून परतलेल्या चौघांपैकी तिघांना ओमायक्रॉन झाल्याचे उघड झाले असून त्यापैकी दोघेजण विलगीकरणात असतानाही देवदर्शन यात्रा करून आले. यात्रेदरम्यान त्यांनी शेकडो जणांना ओमायक्रॉनचा ‘प्रसाद’ दिल्याने महापालिकेने त्यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं. ४ परिसरात राहणारे कल्याणी कुटुंबातील चौघेजण १७ डिसेंबर रोजी केनियातून परत आले. महापालिका आरोग्य विभागाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर, २१ डिसेंबर रोजी त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली. चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांना घरातच विलगीकरणात राहण्यास बजाविले. मात्र, या कुटुंबाने महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत ते देवदर्शन व सहलीसाठी काश्मीर, वैष्णोदेवी आणि अमृतसर येथे गेले. दरम्यान, चौघांपैकी तिघांचा आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. शहरात ओमायक्रॉन रुग्ण आढळल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक कल्याणी यांच्या घरी त्यांना क्वारंटाइन करण्यासाठी गेले असता, ते कुटुंब सहलीसाठी गेल्याचे उघड झाले. याचा आरोग्य यंत्रणेला धक्का बसला असून ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांनी प्रवासादरम्यान किती जणांना प्रसाद दिला, असा प्रश्न उभा ठाकला आहे.

आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या आदेशानंतर सहायक आयुक्त अजित गोवारी यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर, पोलिसांनी कल्याणी कुटुंबातील दोघांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर सुरुवातीला रुग्णालयात, तर आता घरी उपचार करण्यात येत आहेत.

...तरीही भटकंतीमहापालिका आरोग्य विभागाने कल्याणी कुटुंबाला फोन करून, जेथे आहात तेथेच क्वारंटाइन होण्यास सांगितले. मात्र, हे कुटुंब सर्वत्र फिरत होते. ३१ डिसेंबर रोजी हे कुटुंब उल्हासनगरला आल्यानंतर, कोरोना आणि ओमायक्रॉनच्या नियम व अटींचा भंग केल्याचा ठपका महापालिका आरोग्य विभागाने ठेवला. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या