शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

Thane: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर सकल मराठ्यांच्यावतीने घोषणाबाजी, उपोषणाला परवानगी नाकारली

By जितेंद्र कालेकर | Published: October 27, 2023 11:13 PM

Thane News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी एक मराठा, लाख मराठा.. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी घाेषणाबाजी करण्यात आली.

- जितेंद्र कालेकर ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी एक मराठा, लाख मराठा.. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी घाेषणाबाजी करण्यात आली. याठिकाणी साखळी उपोषणाला वागळे इस्टेट पोलिसांनी परवानगी नाकारली असून त्याऐवजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाचे ठाण्याचे अध्यक्ष रमेश आंब्रे यांना १४९ ची नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी ठाण्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाने एकत्र येत २८ ऑक्टाेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडीतील घरासमोर परवानगी मागितली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील साखळी उपोषणाला वागळे इस्टेट पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्याशी चर्चा केली. चर्चेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषणास परवानगी मिळाल्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जागेची पाहणी केली.

मनाई आदेशाचा भंग केल्यास कारवाई दरम्यान, ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ३१ आॅक्टोबरपर्यंत मनाई आदेश लागू असून पाच किंवा पाचपेक्षा एकत्र येत ष्घोषणाबाजी किंवा आंदोलनास मनाई आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या खाससगी निवाससनाबाहेरही आदोलनाला मनाई आहे. या मनाई आदेशाचा भंग केल्यास कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वागळे इस्टेट पोलिसांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदे