अंबरनाथ: अंबरनाथ शहरात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये झेंडा वंदन करण्यात आले. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित साधून अनेक ठिकाणी कार्यक्रमांच आयोजन देखील करण्यात आले होते. मात्र पालिका कार्यालयात झालेल्या झेंडा वंदनाला दोन नगरसेवक वगळता सर्वच नगरसेवकांनी दांडी मारली. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी देखील नगरसेवकांना झेंडा वंदनासाठी वेळ मिळाला नाही याची खंत व्यक्त होऊ लागली आहे.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शहरात अनेक ठिकाणी कार्यक्रमांच आयोजन करण्यात येत. सकाळी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये झेंडावंदन करणे बंधनकारक असल्याने त्या अनुषंगाने शासकीय कार्यालयांमध्ये जय्यत तयारी देखील करण्यात आली होती. अंबरनाथ नगरपालिकेत सकाळी सात वाजता ध्वजारोह अंबरनाथ नगरपालिकेत सकाळी सात वाजता झेंडावंदन करण्यात आले. पालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असल्यामुळे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या हस्ते हा समारोप पार पडला.
या कार्यक्रमाला शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र प्रशासकीय राजवटीत लोकप्रतिनिधींनी मात्र या महाराष्ट्र दिनाच्या झेंडा वंदनाकडे पाठ फिरवल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. माजी नगरसेवक सुभाष साळुंखे आणि उमर इंजिनियर वगळता सर्वच नगरसेवकांनी यंदाच्या महाराष्ट्र दिनाच्या झेंडा वंदनाकडे पाठ फिरवली. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवशी देखील लोकप्रतिनिधी यांची मोजकीच संख्या झेंडावंदनासाठी दिसून येते. मात्र यंदाच्या महाराष्ट्र दिनाच्या झेंडा वंदनाला केवळ दोनच माजी नगरसेवक उपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, अंबरनाथ पालिकेत झेंडावंदन झाल्यानंतर तहसीलदार प्रशांत माने यांच्या हस्ते तहसील कार्यालयात देखील मोठ्या उत्साहात झेंडावंदन करण्यात आले. अंबरनाथ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी झेंडाला सलामी दिली. या सोबतच अंबरनाथ पंचायत समिती कार्यालयात देखील झेंडा वंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला.