बदलापूर: बदलापूरच्या नाईक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्हास नदीच्या तीरावर जागतिक नदी दिवस उत्साहात साजरा केला. यावेळी नदी संवर्धनासाठी आणि स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली यासोबत विद्यार्थ्यांनी या नदीपात्रात स्वच्छता मोहीम बाबत अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला.
बदलापुरातील नाईक विद्यालयामार्फत नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात सामाजिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जातात याच उपक्रमांतर्गत जागतिक नदी दिनाच्या अवचित साधून प्रभात फेरी, पथनाट्य, जलपूजन, जल प्रतिज्ञा यासोबत नदीच्या परिसराची स्वच्छता केली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेला पथनाट्यातून नदी स्वच्छता नदीविषयी जनजागृती करण्यात विद्यार्थी यशस्वी झाले. तसेच नदी किनारी वसलेल्या जोशी बागेला भेट देऊन तेथील भात शेती, फुल शेतीचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. निसर्गात विद्यार्थी फुलपाखराप्रमाणे रमून गेले होते. त्याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रिया महेश जोशी, मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील, कुळगांव बदलापूर नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अकेश म्हात्रे तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.