शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पुन्हा एकदा बहरला ठाण्यातील जेष्ठ नागरिक संगीत कट्टा, ज्येष्ठांनी दिला जुन्या गाण्यांना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 4:48 PM

संगीतातील जादू इतकी मोठी आहे कि त्यातून मिळणारी मन:शांती व समाधान काही वेगळीच असते अशाच समाधानासाठी जेष्ठ नागरिक संगीत कट्ट्याची निर्मिती किरण नाकती यांनी केली.

ठळक मुद्देपुन्हा एकदा बहरला ठाण्यातील जेष्ठ नागरिक संगीत कट्टाज्येष्ठांनी दिला जुन्या गाण्यांना उजाळावसंत पारु ंडेकर या दिव्यांग गायकांनी सादर केले ‘कैवध्याच्या चांदण्याचा’ हे गीत

ठाणे: ९२ वर्षीय भाटे काका व ८२ वर्षीय भालेराव काका या दोन्ही ज्येष्ठ गायकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.अभीर गुलाल उधळीत विठू माऊलीचा गजर करीत दिलीप नारखेडे यांच्या आवाजाने संगीत कट्ट्याची सुरुवात झाली. या कट्ट्याचे वैशिष्ट्य ठरले ते वसंत पारु ंडेकर या दिव्यांग गायकांनी सादर केलेले ‘कैवध्याच्या चांदण्याचा’ हे गीत. त्यांच्या या गायनाला उपस्थितांनी टाळ््याची दाद दिली.

          शरद भालेराव यांनी ‘सवाबाईचा जोगवा’, प्रभाकर केळकर यांनी ‘जिक्र होता हे जब कयामत का’, विजया केळकर यांनी ‘ओ बसंती पावन पागल’, माधवी जोशी यांचे नाट्यगीत, वासुदेव फणसे यांनी ‘चाहुंगा मै तुझे’, प्रगती पोवळे यांनी ‘मेरे सपनो मे आना’, भाटे काका व संदीप गुप्ता यांनी ‘हमे और जिने कि चाहत ना होती’, संजय देशपांडे यांनी ‘बेकरार करके हमे यु ना’, मोरेश्वर ब्राह्मणे यांनी ‘आया है मुझे फिर याद वो जालीम’ ही गाणी आपल्या उत्स्फुर्त आवाजात सादर केली. तसेच विश्वास मुतालिक यांनी ‘अभंग’, सुधाकर कुलकर्णी यांनी ‘मेरा दिल भी कितना पागल’, व्यंकटेश कुलकर्णी यांनी ‘ओ रे ताल मिले के जल’, अविनाश भराटे यांनी ‘मैने चांद और सितारो की’, विष्णु डाकवाले यांनी ‘जाने कहा गये वो दिन’, विश्वनाथ कानासकर यांनी ‘सुहानी रात ढल चूकी’, प्रभात कुलकर्णी यांनी ‘आकाशी झेप घे रे’, अशोक गिरीं यांनी ‘पल पल दिल के पास’, सुहास चांदेकर यांनी रिमझिम गिरे सावन, विवेक जाधव यांनी छु लेने दो नाजुक ओठो को, सुप्रिया पाटील यांनी ‘ऐरणीच्या देवा तुला’, कीर्ती जोशी यांनी ‘येऊ कशी कशी मी नांदायला’, तेजराव पंडागळे यांनी ‘वाजवलेली बासरी’, अदिती पावसकर यांनी ‘केव्हा तरी पहाटे’ या गाण्यांनी तर रंगत आणली. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आपल्या संपुर्ण ताकदीने गाणी सादर करीत होते. या कट्ट्याचे नियोजन आणि सुरेख व्यवस्था तसेच, कट्ट्यामागची किरण नाकती यांची नि:स्वार्थ भावन यांमुळेच संगीत कट्ट्याची आम्हाला ओढ असते अशा भावना या ज्येष्ठ गायकांनी व्यक्त केल्या. बोरिवली, डोंबिवली तसेच ठाणे शहरातील विविध भागांतील एकूण २८ गायकांनी आपली गायन कला सादर केली. या संगीत कट्ट्याचे निवेदन आदित्य नाकती याने केले. आम्हाला या कट्ट्यावर इतका आनंद मिळतोय की, आम्हाला असलेल्या आजारावर सुद्धा या गाण्यामुळे मात करता येते. हा संगीत कट्टा आमचे आयुष्य वाढवणारा ठरतोय असे मत गीतांजली बापट या ज्येष्ठ रसिकांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेmusicसंगीतMumbaiमुंबई