लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांच्या खूनप्रकरणी शाहिद शेख (३१, रा. राबोडी, ठाणे) या संशियतास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-1 च्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून एक कार जप्त केली असून त्याला 3 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत जमील यांचा दफनविधीही केला जाणार नसल्याची भूमिका त्यांचे नातेवाईक आण िमनसेने घेतली होती. त्यामुळे राबोडीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे या संवेदनशील खुनातील आरोपींना पकडणे ठाणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. राबोडीतील बिस्मिल्ला हॉटेलसमोरून २४ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास जमील हे मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्यामागून दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर अगदी जवळून गोळीबार केला होता. त्यानंतर, हल्लेखोर हे पसार झाले होते. या खुनातील आरोपी कितीही मोठा असला, तरी त्याची गय केली जाणार नाही. तपास नि:पक्षपणे केला जाईल, असे आश्वासन ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी जमीलच्या नातेवाइकांना दिले होते. त्यामुळे राबोडी पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाची अशी वेगवेगळी पथके या तपासासाठी नेमली आहेत. राबोडीमध्ये एका खासगी वाहनावर बदलीचालक म्हणून काम करणाऱ्या शाहिद याने त्याचे वाहन या खुनातील आरोपींना पळून जाण्यासाठी दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर खुनातील कटात आणि नियोजनातही त्याचा सक्रीय सहभाग असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्याचे आणखी कोण साथीदार आहेत? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला, गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहारयक पोलीस आयुक्त किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे, संदीप बागुल, प्रफुल्ल जाधव, योगेश काकड, उपनिरीक्षक दत्तात्रय सरक आणि अशोक माने आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.
जमील शेख हत्याप्रकरणी अखेर एका आरोपीस अटक
By जितेंद्र कालेकर | Published: November 27, 2020 12:08 AM
मनसेचे राबोडीतील पदाधिकारी जमील शेख (४९) यांच्या खूनप्रकरणी शाहिद शेख (३१) या आरोपीस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली. आरोपींना पळून जाण्यासाठी त्याने दिलेली मोटारकारही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकची कामगिरीआणखी दोघांचा शोध सुरूच