शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
3
'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका
4
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
5
मुलाला अटक होताच आमदारानं केलं सरेंडर; घरात सापडला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह 
6
Video - सेल्फीचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर उभा असताना आली ट्रेन, 1 सेकंद उशीर झाला असता तर...
7
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
8
“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर
9
कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान
10
"लॉरेन्स बिश्नोईला पाठवू?" भल्या पहाटे सलीम खान यांना धमकी, बुरखाधारी महिलेने रस्ता अडवून...
11
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"
13
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
14
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
15
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
16
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
17
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
18
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
19
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
20
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता

तोतया वारस दाखवून जमीन विक्री प्रकरणी एकाला अटक; सव्वा दोन कोटींची जमीन अवघ्या साडेपाच लाखांना विक्रीचा केला व्यवहार

By धीरज परब | Published: August 27, 2024 6:52 PM

सदर जमीन शासकीय दरा नुसार सव्वा दोन कोटींची असताना अवघ्या ५ लाख ५१ हजारांना त्याची विक्री केली होती . शिवाय अन्य ७ जमिनी सुद्धा विक्रीचा प्रयत्न चालवला होता . 

धीरज परब / मीरारोड - तोतया वारस दाखवून अन्य भाऊ मयत झाल्याचे खोटे दाखले तसेच कागदपत्रे बनवून जमीन विक्री प्रकरणातील तोतया वारसास भाईंदर पोलिसांनी गुजरात मधून अटक केली आहे . सदर जमीन शासकीय दरा नुसार सव्वा दोन कोटींची असताना अवघ्या ५ लाख ५१ हजारांना त्याची विक्री केली होती . शिवाय अन्य ७ जमिनी सुद्धा विक्रीचा प्रयत्न चालवला होता . 

कर्नाटकच्या बंगलोर येथे राहणारे  दिपक शशिकांत शहा यांच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलीस ठाण्यात २० मार्च २०२४ रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता . दीपक यांचे वडील शशिकांत जिवंत असून , काका प्रविण हरगोविंदास शहा, सूर्यकांत व हरकिशन यांचे निधन झालेले आहे. त्यांचे वारस आहेत . सदर कुटुंबाच्या भाईंदर येथे जमिनी असून काही जमिनी पुरषोत्तम पटेल यांना लीज वर दिल्या होत्या .; 

भाईंदर येथील बांधकाम व्यावसायिक अजय धोका हे सदर शाह कुटुंबियांना ओळखत असल्याने शाह कुटुंबाच्या काही जमिनी विक्रीसाठी आल्याचे त्यांना गुजरात वरून समजले .  प्रवीण हे मयत झाले असताना त्यांच्या अधिकारपत्र द्वारे जमीन विक्रीची कागदपत्रे अजय यांनी दीपक व कुटुंबियांना कळवली . 

त्या नंतर माहिती घेतली असता चंद्रकांत प्रभुदास घेलाणी रा . श्री जी एनक्लेव, सोला भागवत, अहमदाबाद , गुजरात ह्याला प्रवीण शहा दाखवून त्या नावाचाआधारकार्ड, पॅनकार्ड बनवले. गुजरातच्या अमरेली येथील न्यायालयाची दिशाभूल करून खोटे शपथपत्र आदींच्या आधारे अन्य तिघे भाऊ मयत असून त्यांना कोणी वारस नाही आणि तोतया प्रवीण हा भाईंदर येथील सर जमिनींचा एकमेव वारस असल्याचा आदेश मिळवला . त्या आधारे एकाच तारखेचे शशिकांत , सूर्यकांत व हरकिशन शाह यांचे मृत्यूचे दाखले अमरेली येथून मिळवले . 

तोतया प्रवीण ह्याने त्याच्या ८ जमिनी पेशइमाम मोहंमद अब्दुल रऊफ, रा. गोम्स चाळ, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, डिमेलो कम्पाऊंड,  कुर्ला पश्चिम ह्याला अधिकार पत्र दिले होते . तर एक जमीन हि तोतया प्रवीण याने , बाजारमुल्य २ कोटी २८ लाख असताना ती फक्त ५ लाख ५१ हजारात देवेंद्र मणिलाल धासवाला, रा.  शांती निकेशन, श्रीनगर कॉलीनी गोरेगाव पश्चिम व सुरेश जादवनकुम, रा. शिवदर्शन टॉवर, अहिंसा मार्ग , चिंचोली बंदर, मालाड ह्यांना द बॉम्बे सतवारा ज्ञाती ट्रस्ट साठी विक्री केली होती . 

कागद्पत्रण मध्ये तसेच ओळखपत्रां मध्ये पत्ता चुकीचा असल्याने तोतया प्रवीण सापडत नव्हता . सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे, उपनिरीक्षक प्रसाद गोवले सह राजेश पानसरे, रविंद्र भालेराव, जानन चव्हाण, राहुल काटकर यांनी  तपास करत तोतया प्रवीण उर्फ चंद्रकांत घेलाणी ह्याला अहमदाबाद मधून २४ ऑगस्ट रोजी अटक केली . ठाणे न्यायालयाने त्याला २८ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे .