उल्हासनगर : शहरातील संच्युरी कंपनीत स्फोट प्रकरणी डीस या संस्थेने केलेल्या चौकशी अहवाला नंतर उल्हासनगर पोलिसांनी टँकर मालक घनश्याम सतीजा याला अटक केली. कंपनी स्फोटात ४ जणांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले होते.
उल्हासनगर कॅम्प नं-१, शहाड गावठाण परिसरातील संच्युरी कंपनीत २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भयंकर स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले होते. याप्रकरणी कंपनी प्रशासनासह टँकर चालक, मालक आदिवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मृता मध्ये टँकर चालकाचा समावेश होता. या स्फोटाचा तपास औद्योगिक संस्था असलेल्या डीस या संस्थने केला असून अहवालात टँकर चालक व मालक यांच्यावर ठपका ठेवला. डीस तपास संस्थेचा अहवाल उल्हासनगर पोलिसांकडे आल्यावर, पोलिसांनी टँकर मालक घनश्याम सतीजा यांना अटक केली. अशी माहिती पोलीस निरीक्षक पी एम गोडसे यांनी दिली आहे.
संच्युरी कंपनीच्या स्फोटाचा तपास डीस या औद्योगिक संस्थेने केला असून अहवालात टँकर चालक नायट्रोजन भरण्यासाठी २७ सप्टेंबर रोजी आला होता. त्याने १० दिवसांपूर्वी टँकर मध्ये भरलेला ऑक्सिजन खाली न करता, नायट्रोजन भरण्यास आला होता. ऑक्सिजनने भरलेल्या टँकर मध्ये नायट्रोजन भरण्यात आला. तेंव्हा भयंकर स्फोट झाला. टँकर चालक-मालकाच्या दुर्लक्षामुळे हा स्फोट झाल्याचा ठपका डीस या औद्योगिक संस्थेने तपास अहवालात ठेवला. डीस संस्थेचा अहवाल उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या मिळाल्यावर, पोलिसांनी टँकर मालक घनश्याम सतीजा यांना अटक केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. संच्युरी कंपनीत स्फोट झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी घटनेची पाहणी करून मृत कामगारांना घर, कंपनीत वारसांना नोकरी, मुलांच्या शिक्षणाचा खर्च व नुकसानभरपाई देण्याची मागणी कंपनी प्रशासनाकडे केली होती.