लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रिव्हॉल्व्हरची तस्करी करणा-या गिरीश दशरथ भोईर (२७, रा. धानिवली, ता. मुरबाड, जि. ठाणे) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून ३२ हजारांचे गावठी बनावटीचे एक रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.कल्याण तालुक्यातील गोवेली येथील चाचाचा ढाबा याठिकाणी एक व्यक्ती रिव्हॉल्व्हरच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस नाईक सतीश कोळी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे, उपनिरीक्षक गणपत सुळे, पोलीस हवालदार प्रकाश साईल, गणेश पाटील आणि सतीश कोळी आदींच्या पथकाने ५ आॅक्टोबर रोजी कल्याण-मुरबाड महामार्गावर चाचाचा ढाबा याठिकाणी सापळा लावून गिºहाइकाच्या शोधात असलेल्या भोईर याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याखाली मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने राजस्थान येथील एका व्यक्तीकडून हे हत्यार आणल्याची माहिती दिली. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण न्यायालयाने दिले आहेत.
रिव्हॉल्व्हरची तस्करी करणा-यास कल्याण परिसरातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 10:51 PM
कल्याण तालुक्यातील गोवेली येथील चाचाचा ढाबा याठिकाणी रिव्हॉल्व्हरच्या विक्रीसाठी आलेल्या गिरीश दशरथ भोईर (२७) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली.
ठळक मुद्दे ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईमुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलएक रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत