शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने लुबाडणाऱ्या टोळीतील एकास अटक: २७ लाखांचे दागिने हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 6:47 PM

दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांचे दागिने लुबाडणाºया टोळीतील रफीकुल शेख (४८, रा. धारावी, मुंबई) यास नौपाडा पोलिसांनी मोठया कौशल्याने अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी शुक्रवारी दिली.

ठळक मुद्दे नौपाडा पोलिसांची कारवाईमुख्य सूत्रधाराचा शोध सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांचे दागिने लुबाडणाºया टोळीतील रफीकुल शेख (४८, रा. धारावी, मुंबई) यास नौपाडा पोलिसांनी मोठया कौशल्याने अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी शुक्रवारी दिली. त्याच्याकडून २७ लाख ५५ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून यातील मुख्य सूत्रधाराचाही शोध घेण्यात येत आहे.नौपाडयातील रहिवाशी अमोद चाचड यांनी २५ फेब्रुवारी २०२१ रोजी ३२ लाख ८० हजारांचे ७६२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी कारागिर राजा शेख याच्याकडे दिले होते. गेल्या अनेक दिवसांपासून तो याच परिसरातील नागरिकांचे सोन्याचे दागिने पॉलिश करुन देत असल्यामुळे त्याच्यावर या भागातील रहिवाशांचा विश्वास होता. यावेळी मात्र त्याने दागिन्यांना पॉलिश करण्याऐवजी त्यांचा अपहार करुन तो पसार झाला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात २५ फेब्रुवारी रोजी चाचड यांनी ४०६ प्रमाणे तक्रार दाखल केली होती. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सखोल तपासाचे आदेश दिले होते. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने शेख याने धारावीमध्ये रफीकुल याला केलेल्या एका कॉलच्या आधारावर तसेच एका खबºयाने दिलेल्या माहितीच्या आधारावर त्याची चौकशी केली. सुरुवातीला आपल्याला यातले काहीच माहिती नाही, असे सांगणाºया रफिकुल याने नंतर मात्र हे दागिने राजाने ठेवण्यासाठी दिल्याची कबुली दिली. त्यानंतर ५ मार्च २०२१ रोजी रफिकुल याला त्याच्या धारावीतील घरातून नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून या अपहारातील २७ लाख ५५ हजारांचे ६४४.४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. यातील मुख्य सूत्रधार राजा शेख आणि त्याच्याकडील उर्वरित पाच लाखांच्या दागिन्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी सांगितले.रफिकुल याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. शुक्रवारी या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक