CoronaVirus : ठाणे जिल्हा सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री निधीला एक कोटींची मदत, अजितदादांकडे दिला धनादेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 12:12 PM2020-05-05T12:12:16+5:302020-05-05T12:13:08+5:30

महाराष्ट्र कोरोनमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने उपाययोजना सुरू आहेत.

One crore assistance from Thane District Central Co-operative Bank to the Chief Minister's Assistance Fund | CoronaVirus : ठाणे जिल्हा सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री निधीला एक कोटींची मदत, अजितदादांकडे दिला धनादेश

CoronaVirus : ठाणे जिल्हा सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री निधीला एक कोटींची मदत, अजितदादांकडे दिला धनादेश

Next

ठाणे : कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मदत म्हणून ‘दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’ तर्फे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड19’साठी एक कोटींच्या मदतीचा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांनी सुपूर्द केला. महाराष्ट्र कोरोनमुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने उपाययोजना सुरू आहेत.

याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या लढ्यासाठी मदत म्हणून  ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड19’ साठी 1 कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आज बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील यांनी सुपूर्द केला. यावेळी आमदार राजेश पाटील, बँकेचे उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र दोंदे उपस्थित होते. ‘दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’चे संचालक, अधिकारी-कर्मचारी, सभासद यांनी  सामाजिक बांधिलकी राखत केलेल्या या मदतीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत.

Web Title: One crore assistance from Thane District Central Co-operative Bank to the Chief Minister's Assistance Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.