शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कुटुंब भेट योजनेतून एक कोटी कुटुंबापर्यंत पोहोचणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 10, 2024 16:36 IST

दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील असंच अभियान सुरू राहील

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी आम्ही कुटुंब अभियान राबवत आहोत. या योजनेसाठी शिवसैनिक घरोघरी जाणार आहेत मी आज पासून सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रात एक लाख शिवसैनिक दररोज १५ घरापर्यंत पोहोचतील, आठवडाभरात आम्ही एक कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहचू असा विश्वास महाराष्ट्राचे मुखि्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच प्रत्येक शिवसैनिकाने १५ कुटुंबांची भेट घ्यायची आहे योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही हे तपासायचे आहे मिळाला नसेल तर त्याची अडचण दूर करायचे आणि मार्गदर्शन करायचे आहे. तसेच, त्यांच्या इतर अडचणी जाणून घेऊन त्याही सोडवायच्या आहेत. दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील असंच अभियान सुरू राहील. कार्यकर्ते लाभार्थ्यापर्यंत पोहोचत आहेत की नाही याचाही ट्रॅक रेकॉर्ड आम्ही ठेवणार आहोत. सरकारच्या इतर योजना देखील आहेत त्यांच्या संदर्भात देखील अचूक माहिती त्या परिवाराला द्यायची आहे.

शासनाने घेतलेले निर्णय आणि आपण घेतलेले निर्णय लाडकी बहीण ही तर सुपरहिट तर झालीच त्याचा लाभ लाडक्या बहिणी घेत आहेत. मी मुख्यमंत्री असोलो तरी एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे मी आदेश देऊन नव्हे तर रस्त्यावरती उतरून घरोघरी जात आहे योजनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मी स्वतः घरी जात आहे असा टोलाही त्यांनी लगावला. एक महिन्यात योजना आली आणि ती महिन्याभराच्या आत सुरू देखील झाली आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या जलद गतीने काम झाले नव्हते ते आमच्या सरकारने करुन दाखविले.

मुख्यमंत्री लाडकी योजनेबाबत लावलेल्या बॅनर वर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नाही यााबत विचारले असता शिंदे म्हणाले की, ही श्रेयवादाची लढाई नाही सरकार म्हणून आपण काम करत आहोत. शासन आपल्या दारी जसे राबवले तसेच आम्ही तिघेही लाडकी बहीण योजनेचा धानादेश वाटपासाठी जातो.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे