शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

प्रवेशासाठी एक कोटींची ऑफर, काँग्रेस नगरसेविकेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 1:39 AM

मुख्यमंत्र्यांची भेट घालून भाजपप्रवेश घडवण्याची ऑफर दिल्याचा आरोप नगरसेविका सारा अक्रम यांचे पती अक्रम मेहराज यांनी केला आहे.

मीरा रोड : काँग्रेसच्या नगरसेविकेला पक्ष सोडण्यासाठी एक कोटी रुपये देण्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घालून भाजपप्रवेश घडवण्याची ऑफर दिल्याचा आरोप नगरसेविका सारा अक्रम यांचे पती अक्रम मेहराज यांनी केला आहे. या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, याआधी फोडण्यात आलेल्या काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांच्या भाजपप्रवेशामागेही आर्थिक व्यवहार झाल्याच्या चर्चेस उधाण आले आहे. दरम्यान, स्वत:चे नगरसेवक काँग्रेसला सांभाळता येत नसल्याने हे खोडसाळ आरोप केल्याचा दावा भाजपने केला आहे.नयानगर परिसर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला, तरी २०१२ च्या महापालिका निवडणुकीत गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यास सुरुंग लावत नरेश पाटील व शबनम शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आणले होते. मात्र, २०१७ च्या महापालिका निवडणुकीआधी राष्ट्रवादीची वाताहत झाल्याने नरेश व शबनमसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी अक्रम मेहराज आदींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नरेश काँग्रेसच्या चिन्हावर, तर शबनम यांचे दीर अमजद हे काँग्रेस समर्थक म्हणून प्रभाग-९ मधून अपक्ष निवडून आले होते. प्रभाग-२२ मधून अक्रम मेहराज यांची पत्नी सारा या काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.महापालिकेत ६१ नगरसेवक निवडून आणून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. शिवसेनेचे २२, तर काँग्रेस आघाडीचे १२ नगरसेवक आहेत. सेना व काँग्रेसचे नगरसेवक फोडण्यासाठी भाजपकडून विरोधी नगरसेवकांना निधी न देणे, प्रभागातील कामे न करणे आदी प्रकारचे दबावतंत्र अवलंबल्याचे आरोप होत आले आहेत.आमदार नरेंद्र मेहतांनी पेणकरपाडा भागातील शिवसेना नगरसेविका अनिता पाटील यांना फोडून आमदार प्रताप सरनाईकांसह सेनेला चांगलाच धक्का दिला होता. त्यावेळीसुद्धा सेनेकडून पाटील यांच्या भाजपप्रवेशामागे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. काँग्रेसचे नरेश पाटील व समर्थक अमजद शेख यांनीसुद्धा आ. मेहतांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. नरेश यांना थेट मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्यात आली होती. सेना व काँग्रेसने फुटीर नगरसेवकांना पक्षांतरबंदीनुसार पद रद्द करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.दरम्यान, शुक्रवारपासून अक्रम मेहराज यांनी सोशल मीडियावर संदेश व्हायरल केला असून, त्यात भाजपकडून आपली पत्नी सारा हिला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी एक कोटी रुपयांची आॅफर देण्यात आल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आणि अन्य फायदेसुद्धा करून देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप केला आहे. मात्र, सारा व मी जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आलो असून, पैशांसाठी नाही. आमचे इमान काँग्रेस पक्ष, स्थानिक नेते मुझफ्फर हुसेन व आमचे मतदार आणि कार्यकर्त्यांसोबत कायम असल्याने भाजपची आॅफर धुडकावून लावल्याचे अक्रम यांनी म्हटले आहे.भाजपकडून आॅफर घेऊन अक्रम यांचे पूर्वी राष्ट्रवादीत असल्यापासून परिचित असलेले भाजप नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील गेले होते. कार्यालयात कॅमेरे लावण्यात आले असल्याने बाहेर एका बाजूस जाऊन चर्चा झाली. पाटील यांनी एका आमदाराशी फोन लावून बोलणेसुद्धा करून दिले, असे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसच्या अन्य काही नगरसेवकांनासुद्धा फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.>अक्रम हे बाहेर बसले होते व मला हाक मारली म्हणून मी बोलत बसलो होतो. एक कोटीची आॅफर, भाजपप्रवेश व मुख्यमंत्र्यांची भेट हे सर्व खोडसाळ आरोप त्यांनी केले आहेत. काँग्रेसचे दोन नगरसेवक भाजपमध्ये आले असून, अन्यसुद्धा रांगेत आहेत. आमच्याकडे स्पष्ट बहुमत असताना एक कोटीची आॅफर कोण मूर्ख देईल का? भाजपला बदनाम करण्यासाठी गलिच्छ आरोप केले जात आहेत.-ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक, भाजप>भाजपमधील एक परिचित व्यक्ती माझ्याकडे आली होती. ती व्यक्ती भाजपमध्ये प्रवेश करा म्हणून आमिषं दाखवत होती. तिने एका नेत्यास फोन लावून बोलणे करून दिले. पण, ती व्यक्ती परिचित असल्याने तिचे नाव मी घेणार नाही.- अक्रम मेहराज,नगरसेविकेचे पती

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर