लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: बांधकाम व्यावसायिक केतन तन्ना यांच्याकडे एक कोटींची मागणी करुन त्यांच्याकडून ८० लाखांची खंडणी उकळणाऱ्या अंकित भानुशाली आणि देवेंद्र भानुशाली या दोघांचाही अटकपूर्व जामीनअर्ज ठाणे सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी सोमवारी फेटाळला. मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध करोडोंची खंडणी उकळल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल आहे. याच गुन्हयात अंकित आणि देवेंद्र यांचाही समावेश आहे.अंकित आणि देवेंद्र भानुशाली यांनी निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरुन केतन तन्ना यांच्याकडे एक कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. यातील ८० लाख रुपये तन्ना यांनी दिले होते. मात्र, उर्वरित २० लाख रुपयांसाठी या दोघांनीही तन्ना यांना धमक्या देत त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. याच आरोपासंदर्भात अंकित आणि देवेंद्र यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. याच अर्जावरील सुनावणी सोमवारी झाली. त्यावेळी सत्र न्यायाधीश ताम्हणेकर यांनी या दोघांवरील आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांचे अटकपूर्व अर्ज फेटाळले. तन्ना यांच्या वतीने अॅड. सागर कदम आणि पंकज कवळे यांनी अटकपूर्व जामीन न मिळण्यासाठी बाजू मांडली. तर आरोपींच्या वतीने अॅड. व्ही. एस. जाधव यांनी बाजू मांडली. २८ आरोपींपैकी संजय पुनामिया याचा अटकपूर्व अर्ज यापूर्वीच न्यायालयाने फेटाळला आहे. तर प्रदीप शर्मा, विकास दाभाडे आणि सुनिल देसाई या निलंबित पोलीस कॉन्स्टेबलनेही अटकपूर्व जामीनअर्जही यापूर्वीच मागे घेतला आहे. मात्र, या गुन्हयात अद्यापर्यंत ठाणे पोलिसांनी कोणालाही अटक केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
परमबीर सिंग खंडणी प्रकरण:ठाणे न्यायालयाने फेटाळला दोघांचा अटकपूर्व जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 8:25 PM
बांधकाम व्यावसायिक केतन तन्ना यांच्याकडे एक कोटींची मागणी करुन त्यांच्याकडून ८० लाखांची खंडणी उकळणाऱ्या अंकित भानुशाली आणि देवेंद्र भानुशाली या दोघांचाही अटकपूर्व जामीनअर्ज ठाणे सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी सोमवारी फेटाळला. मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध करोडोंची खंडणी उकळल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल आहे.
ठळक मुद्देएक कोटींची खंडणी वसूलीकेतन तन्ना यांच्याकडून उकळले ८० लाख रुपये