ठाणे : मद्याची दुकाने बंद असल्याने मद्यप्रेमींचा हिरमोड झाला होता. अखेर दोन महिन्यानंतर मद्याची दुकाने अखेर रविवारी सुरु करण्यात आली. परंतु केवळ परवाना धारकांनाच मद्याची घरपोच सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक विनापरवाना धारकांचा यामुळे हिरमोड झाला आहे. असे असले तरी, दुसरीकडे जिल्ह्यात सुरु झालेल्या घरपोच मद्य विक्र ीला मद्यप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी मद्य विक्र ीला सुरु वात होताच अवघ्या २४ तासात जिल्ह्यात ५ हजार ८४५ मद्याप्रेमिनी या सेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती ठाणे राज्य उत्पदान शुल्क अधीक्षक नितीन घुले यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील प्रतिबंधितक्षेत्र वगळून इतर भागात घरपोच मद्य विक्र ीला ठाणे जिल्हाधिकारी यांनी परवागनी दिल्यानंतर घरपोच मद्याविक्र ीसाठी मद्याविक्र ेत्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने ओळखपत्र देण्यास सुरूवात केली आहे. सध्याच्या घडीला ठाणे जिल्ह्यात १९० मद्य विक्र ीची दुकाने आहेत. त्यापैकी शनिवारी ४० तर रविवारी ५३ असे एकूण ९३ विक्र ेत्यांना हे ओळखपत्र देण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत ९३मद्य विक्र ेत्यांचा घरपोच विक्र ीचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे ५० टक्केच मद्य विक्र ेत्यांना हे ओळखपत्र देण्यात आले आहेत. या दुकानांमध्ये घरपोच मद्य पोहचिवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्र तयार करण्यात आले आहेत. त्यांची संपूर्ण माहिती, डॉक्टरांचा तपासणी अहवाल तपासूनच त्यांना ओळखपत्र देण्यात येत आहे. घरपोच मद्यविक्र ी ही लघुसंदेश, व्हॉट्सअँप आणि दुरध्वनीद्वारे करता येणार आहे. त्यानुसार रविवार पासून घरपोच मद्य विक्र ीची सेवा सुरु झाल्यापासून अवघ्या २४ तासात जिल्ह्यातील विविध भागातील ५ हजार ८४५ जणांनी या घरपोच सेवेचा लाभ घेत, मोठ्या प्रमाणत मद्य रिचवत रविवारचा दिवस सत्कारणी लावला आहे.केवळ परवानाधारकांनाच मद्य मिळणार असल्याने विनापरवानाधारकांचा हिरमोड झाला आहे. असे जरी असले तरी दुसरीकडे मोठ्या प्रमाणात परवाना काढण्यासाठी आॅनलाईन अर्ज करत असल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन विभागाच्यावतीने देण्यात आली.
एका दिवसात ५ हजार ८४५ मद्यप्रेमींनी घेतला मद्याचा आस्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 4:30 PM