ठाणे: राज्य शासनाने ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम गुरूवारपासून पुढील दोन महिन्यांसाठी लागू केला आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांसमवेत तीन दिवस राहून त्यांचे सुख, दु:ख, अडीचणी, त्यावरील उपाय आदीं जाणून घेणार आहे. या दौर्याप्रसंगी आग्रह केला तरी शेतकऱ्यांच्या घरी, अन्यत्र कोठे रात्रीचे वास्तव करून टीका ओढवून न घेता या उपक्रमाच्या पहिल्याच दिवसापासून सर्व कृषी अधिकाऱ्यांची स्वतः रात्रीच्या मुक्कामासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत किंवा आश्रमशाळेत राहून पायंडा घालून दिला आहे, असे कोकण विभागीय कृषी उपायुक्त अंकुश माने यांनी लोकमतला सांगितले.
या उपक्रमास अनुसरून लोकमतने ‘बर्मुडा, टीशर्ट घालून ‘साहेब’ राबणार शेतात’ या मथळ्याखाली २ सप्टेंबर रोजी वृत्तप्रसिध्द करून या दौऱ्याातील अधिकारी फार्म हाऊसमध्ये राहून दौरा पूर्ण करणार की काय अशी शंका व्यक्त केली होती. मात्र अशी शंका कूशंका येणार असल्याचे आधीच लक्षात घेऊन या उपक्रमाच्या पहिल्या दिवसाच्या प्रारंभासाठी एक दिवस आधीच म्हणजे ३१ आॅगस्टला कृषीचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्याामधील केवनाळ-सूर्यमाळ येथील आश्रम शाळेत व विभागीय उपायुक्त अंकुश माने यांनी सावदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रात्रीचा मुक्कम केला, असे माने यांनी लोकमतच्या लक्षात आणून दिले. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, विविध समस्याा प्रशासनाने समजून घेत त्यावर कोणत्या उपाययोजना,धोरणात्मक निर्णय घ्यावेत, यासाठी राज्य शासनाने प्रशासनातील राज्य व जिल्हास्तरीय अधिकारी, पदाधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ, एसडीओ, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदींना आता महिन्यातून तीन दिवसव महसूल, ग्रामविकास व इतर विभागाच्या अधिकºयांनी महिन्यातून एक दिवस शेतकºयांसोबत शेतात घालवायचा आहे. गावांना भेटी द्यायच्या आहेत. यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’हा उपक्रम १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या दोन महिन्याच्या कालावधीसाठी सुरू केला आहे. पण हा उपक्रमही अधिकारी पिकनिक दिन किंवा शेतावरील सहल म्हणून घालवतील असे लोकांमध्ये ऐकायला मिळत आहे. पण कृषी विभागाच्या या आधीकाºयांनी पहिल्या दिवसांपासूनच शेतकºयांच्या घरी, किंवा फार्म हाऊसमध्ये न राहता गांवातील शाळेत रात्री वास्तव्याला राहून कर्तव्य बजावण्याचा पायदा या उपक्रमाच्या पहिल्या दिवसापासून सुरू केला असल्याचे माने यांनी लोकमतला सांगितले.‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’या उपक्रमाचा पहिल्या दिवसाच्या प्रारंभासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भागामधील मोखाडा तालुक्यातील सावदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विभागीय उपायुक्त अंकुश माने यांनी रात्री मुक्काम केल्याचे वास्तव छायाचित्र.