डोंबिवली: कल्याणमधील नागरिकांसह डोंबिवलीतील नागरिकांना भेटायला मला आवडेल. या महापालिकेतील ही दोन्ही शहर अविभाज्य घटक असून आगामी काळात लोकहितावह निर्णय घेण्याचा मानस असून डोंबिवलीकरांसाठी महिन्यातील एक दिवस निश्चित वेळ ठरवून येणार असल्याचे सुतोवाच नवनिर्वाचीत आयुक्त गोविंद बोडके यांनी सांगितले.यासंदर्भात गुरुवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयात झालेल्या सर्व अधिका-यांच्या बैठकीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला असून नेमका दुसरा की तिसरा आठवड्यातील एखादा वार हे निश्चित झाले नसून त्याचे नियोजन सुरु असल्याचे सांगण्यात आले. तसेच कच-याचे व्यवस्थापन करणा-या सोसायट्यांना विशेष सहकार्य करण्यात येणार असल्याचेही आयुक्त म्हणाले. पाण्यासंदर्भात आगामी काळात शहरात जनजागृती कशी करायची यासाठीही नियोजन सुरु असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.दर सोमवारी ठरल्याप्रमाणे मुख्यालयात संध्याकाळी ३ ते ५ वाजेपर्यंत नागरिकांना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पुरुष व महिला नगरसेवकांनाही आधी जशी रचना होती, त्याच वारांना भेटणार असल्याचेही ते म्हणाले. डोंबिवलीकरांसाठी मात्र निश्चितपणे भेटीला येणार, त्यांचे गा-हाणे ऐकून त्यांच्या समस्यांना वाचा फोडणार, त्या दूर करणार असल्याचा निर्णय आहे. केवळ आयुक्त एकटेच नव्हे तर महापालिकेच्या विविध विभागातील अधिका-यांसमवेत नागरिकांना भेटणार असल्याचे ते म्हणाले.
डोंबिवलीकरांसाठीही महिन्यातला एक दिवस - आयुक्त गोविंद बोडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 5:47 PM
कल्याणमधील नागरिकांसह डोंबिवलीतील नागरिकांना भेटायला मला आवडेल. या महापालिकेतील ही दोन्ही शहर अविभाज्य घटक असून आगामी काळात लोकहितावह निर्णय घेण्याचा मानस असून डोंबिवलीकरांसाठी महिन्यातील एक दिवस निश्चित वेळ ठरवून येणार असल्याचे सुतोवाच नवनिर्वाचीत आयुक्त गोविंद बोडके यांनी सांगितले.
ठळक मुद्दे कचरा व्यवस्थापन करणा-या सोसायट्यांना विशेष सहकार्यगा-हाणे ऐकून त्यांच्या समस्यांना वाचा फोडणार