शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

वन-डे ट्रीपला पसंती : व्हॉट्सअ‍ॅपवर पिकनिक प्लान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 6:44 AM

मान्सूनचे दमदार आगमन होताच तरुणाई पिकनिकच्या मूडमध्ये आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा पावसाने लवकर बरसण्यास सुरुवात केल्याने पिकनिक, ट्रेक किंवा धबधब्यांवर जाण्याच्या प्लान्सने व्हॉट्सअ‍ॅप दुथडी भरून वाहू लागले आहे.

ठाणे - मान्सूनचे दमदार आगमन होताच तरुणाई पिकनिकच्या मूडमध्ये आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा पावसाने लवकर बरसण्यास सुरुवात केल्याने पिकनिक, ट्रेक किंवा धबधब्यांवर जाण्याच्या प्लान्सने व्हॉट्सअ‍ॅप दुथडी भरून वाहू लागले आहे.गेले काही दिवस कमालीचा उकाडा असल्याने सुटीच्या दिवशी बाहेर पडण्याचा विचारही करणे मुश्कील होते. मात्र, पावसाच्या सरी कोसळू लागताच निसर्ग बहरलेला असतो. हा बहरलेला निसर्ग सहलप्रेमींना खुणावू लागला असून जून महिन्याच्या अखेरीस अथवा जुलैमधील पिकनिकच्या प्लानिंगला उधाण आले आहे. तरुणाईचे कट्टे किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर पिकनिकच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. सहलप्रेमींना धबधबे, ट्रेकिंग पॉइंट, रिसॉर्ट खुणावू लागले आहेत. कित्येक फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. भंडारदरा, कोंडेश्वर, वदप, भुशी डॅम, भिवपुरी, पळसदरी, माथेरान, तुंगारेश्वर, राधा फॉल, पांडवकडा, झेनिथ, गाढेश्वर, फणसाड, आषाणे, थिदबीचा धबधबा, असे प्लान सुरू झाले आहेत. ट्रेकिंगसाठी गड, किल्ले यांची निवड सुरू आहे. लोणावळा, खंडाळा, माळशेज घाट यासारख्या गजबजलेल्या ठिकाणांबरोबरच जवळपासचे धबधबे किंवा व्हर्जिन पिकनिक स्पॉट शोधण्याची चर्चा सुरू झाली आहे. वीकेण्डला कोसळणारा पाऊस ही तर वन-डे पिकनिकसाठी पर्वणी असल्याने काही पहिल्या पावसाचा आनंद घेण्याकरिता रवाना झाले आहेत. नंतर, पावसाला ब्रेक लागेल आणि गेल्या दोन वर्षांप्रमाणे पिकनिकचे प्लानिंग फसेल, त्यामुळे पाऊस कोसळत असतानाच छोटा ग्रुप करून घराबाहेर पडा, असा सूर आहे. गेली दोन वर्षे जून महिना संपायला आला, तरी पावसाने ठाणे, मुंबई परिसरांत दडी मारल्याने तरुणाईच्या पावसाळी पिकनिकच्या उत्साहाला ब्रेक लागला होता. पावसाळी पिकनिकला घराबाहेर पडायचे आणि पावसाचा पत्ताच नसेल, तर सर्वच प्लानिंग फसते. त्यामुळे अगोदर प्लान करून पिकनिक या कल्पनेला फारशी पसंती नाही. यंदा पाऊस लवकर आलाय. तो समाधानकारक पडण्याचे भाकीत आहे. त्यामुळे पिकनिकचे मुहूर्त लाभतील, अशी आशा आहे.यंदा मी भंडारदरा आणि तिथून जवळच असणाऱ्या हरिश्चंद्र गडला जाणार आहे. निसर्गरम्य परिसर आणि पाऊस क्या बात... मुंबईचे धबधबे आता पार्टी करण्याचे स्पॉट झालेत. त्यामुळे थोडे लांब पण निवांत ठिकणीच जाणार आहे.- हनिफ तडवी, डोंबिवलीपावसाच्या सरींनी चिंब भिजवायला सुरु वात केली आहे. त्यामुळे प्रत्येकालाच पावसाळी सहलीचे वेध लागले आहेत. निसर्गप्रेमींनी आवर्जून इथे भेट द्यावी, असे हे ठिकाण म्हणजे अलिबाग येथील फणसाड धबधबा. या जागेचे वैशिष्ट्य असे की डोंगर, धबधबा आणि जवळच असलेला काशीद बीच. निसर्गाचे प्रत्येक रूप इथे अनुभवायला मिळत असल्याने या पावसाळ्यात फणसाडची सहल नक्की.- प्रतीक्षा पांढरे, ठाणेपाऊस सुरू झाला आहे. पिकनिक आणि ट्रेकसाठी ही अगदी योग्य वेळ आहे. त्यापुढचा वीकेण्ड मोठा आहे. त्यामुळे कुठेतरी नदीकाठी असलेल्या रिसॉर्टला जाऊन मजा किंवा नेहमीप्रमाणे मोठ्या ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे. - निखिल लोखंडे, ठाणेखूप दिवसांपासून वाट पाहायला लावणारा पाऊस नेमका आलाच. उन्हाळ्यात सह्याद्रीभ्रमंती करणे म्हणजे खूपच त्रासदायक. म्हणूनच, पावसाळा सुरू झाला की, बॅग उचलायची आणि निघायचे. अजून थोडा पाऊस पडला की, हरिश्चंद्र गड (कोकणकडा), हरिहर गड आणि साल्हेर-सालोट, तसेच बाइक राइडला जायचासुद्धा प्लान करणार. - भावेश समर्थ, ठाणेया पावसाळ्यात आमचा प्लान आहे, नाशिकजवळ पहिणे धबधब्याला जाण्याचा. पहिणेजवळच गावाच्या ठिकाणी वर दºयांमध्ये लपलेला धबधबा आहे. त्यामुळे या धबधब्याला जायचे असेल, तर ट्रेकिंग करत. त्यामुळे इथे ट्रेकिंग आणि पिकनिकही होते.- अनुश्री जुन्नरकर, ठाणे

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपRainपाऊस