उल्हासनगर : गोल मैदान शेजारील कोमल पार्क या इमारतीच्या पाचवा मजल्याच्या स्लॅब दुरुस्तीचे कोसळल्याने एका बिगाऱ्याचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. महापालिकेने यापूर्वीच इमारतीला धोकादायक म्हणून घोषित केल्यावरही २१ कुटुंब राहत होते.
उल्हासनगरात गेल्या वर्षी इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. यावर्षी महापालिकेने धोकादायक इमारतीना नोटिसा देऊन फ्लॅटधारकांना इमारत खाली करण्याचे बाजाविले होते. गोलमैदान येथील व महापालिका प्रभाग समिती क्र-१ कार्यालयाच्या बाजूची कोमल पार्क ही ५ मजल्याच्या इमारत असून यामध्ये एकून २१ प्लॉट, २ दुकान, एक डी मार्ट आहे. पावसाळ्यापूर्वी इमारत धोकादायक असल्याने, तीन वेळा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. आयुक्त अजीज शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी इमारतीला भेट देऊन माहिती घेतली.
इमारतीच्या फ्लॅट क्रं-५०२ चे मालक जतीन चैलानी असून त्या फ्लॅटमध्ये जानकीदेवी जयसिंघानी या एकट्या भाडेकरू म्हणून राहतात. त्यांनी फ्लॅटची अंतर्गत दुरुस्ती बिगारी यांच्या मार्फत सुरू केली. मात्र गुरवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान स्लॅब कोसळून एकाच मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. इमारतीचे बांधकाम १९९४ साली झाल्याचे समजते. या इमारतीत २१ फ्लॅट असून २ दुकाने व एक डी मार्ट आहे. मृत्यू झालेल्या बिगारी कामगारांचे नाव अध्याप माहित झाले नसून पोलीस कसून शोध घेत आहे.
२१ कुटुंब बेघर, जायचे कुठे? कोमल पार्कचा स्लॅब कोसळून एक जण मृत्यू झाल्याने, महापालिकेने इमारत खाली करण्यास घेतली आहे. २१ कुटुंबा मध्ये भाडेकरू नागरिकांचा भरणा असलेतरी, आता जायचे कुठे असा प्रश्न त्यांच्या समोर पडला. इमारतीमधील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन जवानांनी सुरक्षित बाहेर काढले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम व इतर पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते.