लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: बँकेच्या एटीएम कार्डची केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली घोडबंदर रोड येथे राहणाऱ्या एका ५१ वर्षीय विवाहितेची एक लाख १९ हजारांची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी बुधवारी चितळसर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रीनवूड कॉम्पलेक्स, हाईडपार्कमध्ये राहणारी ही महिला १८ मे २०२१ रोजी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास घरी असतांना तिच्या मोबाईल क्रमांकावर एका महिलेने कॉल केला. बोलण्याच्या ओघात तिचा विश्वास संपादन करुन एटीएम कार्डची केवायसी अपडेट करायची आहे, अशी तिने बतावणी केली. तिच्याकडून कार्डची माहिती घेतल्यानंतर तिच्या एसबीआय बँकेच्या क्रेडीट कार्डद्वारे अनुक्रमे ९९ हजार आणि २० हजारांची रक्कम आॅनलाईन बँक खात्यातून वळती केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने २ जून रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शिंदे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
एटीएम कार्डची केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली एक लाख १९ हजारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 1:06 AM
बँकेच्या एटीएम कार्डची केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली घोडबंदर रोड येथे राहणाऱ्या एका ५१ वर्षीय विवाहितेची एक लाख १९ हजारांची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच घडली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने २ जून रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
ठळक मुद्दे चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा