बदलापूर : लोकलच्या डब्यात एक लाख विसरलेल्या प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी त्याचे पैसे परत केले आहेत. कल्याणला राहणारे नितेंद्र शंकलेशा शुक्रवारी दुपारी मुंबईहून कल्याणला आले होते. त्यांच्या आईला ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लाखो रु पये लागणार, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे नितेंद्र हे आपल्यासोबत घेऊन आलेले एक लाखाची रक्कम कमी पडल्याने आणखी पैसे घेण्यासाठी कल्याणला आले. मात्र, प्रवासादरम्यान सोबत आणलेले लाख रु पये ते डब्यातच विसरले. कल्याण स्थानकावर ते उतरले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. मात्र, तोपर्यंत लोकल बदलापूरच्या दिशेने निघून गेली होती. त्यांनी लगेच संबंधिताची माहिती कल्याण स्टेशन मास्तरांना दिली. कल्याण स्टेशन मास्तरांनी अंबरनाथ आरपीएफ आणि अंबरनाथ स्टेशन मास्तरांना माहिती दिली. अंबरनाथ रेल्वे स्थानकाचे संतोष बुदेरा, कुंदन कुमार आणि आरपीएफचे शिवाजी मानकरे, प्रभाकर शेळके यांनी रेल्वेच्या रक्कम आपल्या ताब्यात घेऊन नितेंद्र यांना परत केली.
लोकलमध्ये विसरलेले एक लाख मिळाले
By admin | Published: October 15, 2016 6:44 AM