ठाणे : जिल्ह्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका, पाेटनिवडणुकांसाठी ५ नाेव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी ९२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना एक लाख एक हजार २३२ मतदार मतदान करतील. त्यासाठी २०० मतदान केंद्रांवर प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. यासाठी चाेख पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर ६ नाेव्हेंबरला संबंधित तालुक्याच्या ठिकाणी मतमाेजणी करण्यात येणार आहे.
मतदान हाेणाऱ्या ग्रामपंचायतींत सार्वत्रिक निवडणुका ४८ ग्रामपंंचायतींच्या असून पाेट निवडणुका १४ ग्रामपंचायतींच्या होणार आहेत. सार्वत्रिक निवडणुकीच्या १२ ग्रामपंचायती आधीच बिनविराेध विजयी झाल्या आहेत. तर शहापूरच्या एका ग्रामपंचायतीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाली नाही. याशिवाय ३१ ग्रामपंचायतींच्या पाेटनिवडणुका या बिनविराेध झाल्या आहेत. तर सातच्या पाेटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत. त्यामुळे येथे निवडणूक प्रक्रिया पार पडणार नसल्याचे उघड झाले. सार्वत्रिक व पाेटनिवडणूक आदी मिळून ६२ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याचे उघड झाले आहे.सरपंचपदासाठी १३५ उमेदवार रिंगणात
जिल्हाभरातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान आहे. यामधील सरपंचपदाच्या ४४ जागांसाठी १३५ उमेदवार नशीब अजमावत आहेत. तर सदस्यपदाच्या ३४५ जागांसाठी ७१९ उमेदवार रिंगणात आहेत. या सरपंच व सदस्य पदाच्या उमेदवारांना ९३ हजार ९०४ मतदार मतदान करणार आहेत. १८३ मतदान केंद्रांवर हाेणाऱ्या मतदानाचा हक्क ५१ हजार ५२० पुरुष व ४२ हजार ३६७ महिला मतदानाचा हक्क बदलणार आहे. याप्रमाणेच १४ ग्रामपंचायतींच्या पाेटनिवडणुकीसाठी एका सरपंचपदासाठी ७३ सदस्यांसाठी सात हजार ३२८ मतदार मतदान करणार आहे. १७ मतदान केंद्रांवर तीन हजार ८८८ पुरुष व तीन हजार ४४० महिला मतदान करणार आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय आढावातालुका - ग्रा.पं.ची संख्या - पाे.ग्रा.पं.-भिवंडी - १३ - ०१शहापूर - १६ - ११
मुरबाड - १९ - ०१
अंबरनाथ - ०० - ०१