मीरारोड - मासेमारीसाठीच्या मोठ्या बोटीतून उतरून किनाऱ्यावर जाण्यासाठी लहान होडीत उतरत असताना होडी कलंडून एक खलाशी समुद्रात बुडाल्याची घटना घडली भाईंदरच्या पाली किनाऱ्या जवळ घडली आहे.
सोमवारी रात्री रोझरी नावाची मच्छीमार बोट मासेमारी करून किनाऱ्या पासून काही अंतरावर आली. मोठी बोट तेथेच नांगरून लहान होडीतून किनाऱ्यावर जाण्यासाठी ८ खलाशी निघाले. परंतु काही अंतरावरच होडी कलांडली व खलाशी समुद्रात पडले.
त्या पैकी ७ जण पोहत पुन्हा मोठ्या बोटीवर गेले. परंतु नानकु कोल हा मुळचा झारखंडचा खलाशी मात्र बुडाला. समुद्रात बुडालेली लहान होडी ही भाईंदरच्या खाडीत सापडली आहे. परंतु बुडालेल्या खलाशी चा अजून शोध लागलेला नाही.