ठाणे- ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही संततधार पाऊस सुरू असल्यामुळे या दरम्यान तीन घरे पडली, तर शहापूरच्या वासिंदे येथील साईनाथ ठोंबरे हे भातसा नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यांचा शोध सुरू आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३३४.४ मिमी पाऊस पडला आहे. सरासरी ४१.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. या पावसा दरम्यान तीन घरे पडली आहेत. यामध्ये भिवंडी तालुक्यातील मैदे येथील एक पके घर पडले आहे. तर शहापूरच्या वेहेळोली येथील एक व मुरबाड तालुक्यातील देवगांवमधील एक असे दोन कच्चे घरे पडल्याची नोंद स्थानिक प्रशासनाने घेतली आहे. याशिवाय या शहापूरच्या नान्हेंणे येथे वीजेच्या धक्याने गाईंचा व वासराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
धरण क्षेत्रातही पाऊस-
ठाणे जिल्हयातील धरणांमध्ये पाऊसाने जोर धरला आहे. त्यामुळे भातसा धरणात 54.13 टक्के पाणी साठा तयार झाला आहे. तर बारवी धरणात 45-11 टक्के, तानसात 47.57 टक्के व मोडक सागरमध्ये 72.64 टक्के पाणी साठा तयार झालेला आहे. त्यामुळे लवकरच पाणी समस्या दूर होणार असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. धिरणासह उल्हासनच्या पातळीतही वाढ झाली आहे. या नदीच्या बदलापूरजवळी पाण्याची पातळी 14.20 मीटर आहे. तर मोहने बंधार्याजवळ 6.33 मीटर व जांभूळपाडा येथे उल्हासनदीची पाणी पातळी 11.30 मीटर नोंद करण्यात आली आहे.
धरण- एकूण साठा आजचा साठा पातळी मी पाठस मी. गेल्या वर्षीचा साठा
भातसा- ९४२.१०
५१०-
१२३.४० ८९
१५८.७९ ७३-
३५३.३२ दलघमी
मो. सागर
९३.६५-
७३.९१
तानसा- १४५.०८ ६९.०२ १२४.२४ ६८- ६९.५८
१२८.९३
१९३.५३
६५.६३
८९
बारवी-
३३८.८४
१५२.८५
२५९.६५
६४.०८-
१४-
२०.४९
आंधा-
३३९.१४ ८७.१८- ६५५.२६ १०७- ६३.४२