शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

एक चाचणी पॉझिटिव्ह, दुसरी निगेटिव्ह; संशयित बुचकळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 2:02 AM

‘अ‍ॅण्टीजेन’च्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह

कल्याण : पूर्वेतील कोळसेवाडीत राहणाऱ्या विवेक कांबळे (२६) यांनी केडीएमसीच्या रुग्णालयात केलेली कोरोनाची अ‍ॅण्टीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर, खाजगी लॅबमध्ये केलेल्या स्वॅब चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे नेमक्या कोणत्या चाचणीचा अहवाल खरा आहे, कोरोना झाला आहे की नाही, अशा संभ्रमात ते पडले आहेत. दरम्यान, याविरोधात कोरोना संघर्ष समितीने आवाज उठविला असून अ‍ॅण्टीजेन चाचणीच्या विश्वसनीयतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

केडीएमसी हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अधिकाधिक रुग्णांची चाचणी करण्यावर केडीएमसीने भर दिला आहे. मनपाच्या हद्दीत सध्या सहा स्वॅब कलेक्शन सेंटर असून, आणखी दोन सेंटर वाढवण्याचा विचार आहे. तसेच मनपाने १० हजार अ‍ॅण्टीजेन टेस्ट किट खरेदी केले आहेत.

कांबळे यांनी १८ जुलैला मनपाच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात अ‍ॅण्टीजेन चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सेकंड ओपिनियन म्हणून त्यांनी २४ तासांत खाजगी लॅबमध्ये स्वॅब टेस्ट केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे ते संभ्रमित पडले. भिन्न अहवालांमुळे त्यांनी कोरोना संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिल काकडे यांच्याकडे दाद मागितली आहे.काकडे यांनी सांगितले की, कांबळे यांनी केडीएमसीच्या रुग्णालयातील अ‍ॅण्टीजेन चाचणीच्या अहवालावर विश्वास ठेवून उपचार सुरू केले

असते, तर त्यांची खाजगी रुग्णालयांनी लूट केली असती. तसेच कोरोना नसतानाही त्यांच्यावर कोरोनाचे उपचार केले गेले असते. त्याचा दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाला असता. याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी केला आहे.दरम्यान, याबाबत केडीएमसीच्या साथरोग नियंत्रण विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील म्हणाल्या की, अ‍ॅण्टीजेन

टेस्टमध्येही घशातील स्वॅब घेऊन तो एका रसायनामध्ये बुडविला जातो. तो त्या किटवर ठेवला की, दोन लाइन आल्यावर रुग्ण पॉझिटिव्ह, तर एक लाइन आल्यावर रुग्ण निगेटिव्ह आहे, असे समजले जाते.रुग्णाची दुसरी चाचणी करणे गरजेचे ठरते. संबंधित रुग्णाला २४ तासांनंतर लक्षणे दिसून आली नसल्याने त्यांचा अहवाल खाजगी लॅबमध्ये निगेटिव्ह आला आहे. त्यात चुकीचे काही घडलेले नाही.

‘...तर किटची पुढील खरेदी करू नये’

चाचणीची विश्वसनीयता नसेल तर पुढील टप्प्यातील ५० हजार किटची खरेदी करून नागरिकांच्या पैशांची वाट लागू नये, अशी मागणी कोरोना संघर्ष समितीने केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे