ठाणे : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे एक हजार ४९० रुग्ण आढळले असून, ५७ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ९९ हजार ४५१ बाधितांची नोंद झाली असून, मृतांची संख्या आठ हजार ४२७ झाली आहे.
ठाणे शहरात ३०६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख २६ हजार १८० झाली. शहरात आठ मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार ७९८ नोंदवण्यात आली. कल्याण-डोंबिवलीत ४८१ रुग्णांची वाढ झाली असून, १८ मृत्यू झाले आहेत. आता एक लाख २९ हजार ४११ रुग्ण बाधित असून, एक हजार ६६२ मृत्यूंची नोंंद झाली आहे. उल्हासनगरला ३८ रुग्ण सापडले असून, दोन मृत्यू झाले. यामुळे येथील बाधितांची संख्या १९ हजार ७१६, तर ४५७ मृतांची नोंद आहे. भिवंडीला १२ बाधित असून, तीन मृत्यू आहेत. आता बाधित १० हजार २१२ असून मृतांची संख्या ४१७ झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये १६५ रुग्ण आढळले असून, नऊ मृत्यू आहेत. यामुळे शहरात बाधितांची संख्या ४७ हजार ६५ झाली असून, मृतांची संख्या एक हजार १८१ वर गेली.
अंबरनाथमध्ये ४७ रुग्ण आढळल्याने आता बाधित १८ हजार ७६८ असून, चार मृत्यू आहेत. येथील मृत्यूंची संख्या ३९६ झाली आहे. बदलापूरमध्ये ८७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित २० हजार एक झाले. या शहरात दोन मृत्यू झाल्याने मृत्यूंची संख्या २३० झाली आहे. ग्रामीणमध्ये १९९ रुग्णांची वाढ झाली असून दहा जण दगावले. आता बाधित ३१ हजार ८५८ तर आतापर्यंत ७८९ मृत्यू झाले आहेत.