लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रेल्वे सेवा सध्या बंद आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. अशावेळी रस्त्यावरील अपघातांमध्ये मृत्युचे प्रमाण वाढल्यामुळे ठाणे शहर वाहतूक शाखेने गेल्या तीन दिवसात हेल्मेटचा वापर न करताच मोटारसायकल चालविणाºया एक हजार ८८९ चालकांकडून नऊ लाख ३४ हजारांचा तर सीटबेल्टचा वापर न करणाºया मोटारकार चालकांकडून एक लाख ६८ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.मार्च २०२१ पासून सुरु झालेल्या कोरोनाच्या दुसºया लाटेमध्ये उपनगरी रेल्वे सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवांसाठी सुरु ठेवण्यात आली आहे. त्यामुळे खासगी कामासाठी किंवा नोकरीसाठी मुंबईतून ठाणे परिसरात ये- जा करणाºया नागरिकांना रेल्वेत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे अनेकजण मिळेल त्या वाहनाने मुंबईतून ये- जा करीत आहेत. त्यामुळेच सध्या ठाणे ते मुंबईकडे जाणाºया रस्त्यावर मोठया प्रमाणात गर्दी वाढल्यामुळे वाहतूकीची वर्दळ वाढल्याचे पहायला मिळत आहे. वाढत्या वाहनसंखेमुळे अर्थातच अपघातांचे प्रमाणही वाढले असून अपघातांमध्ये ७० टक्के अपघात हे मोटार सायकल (बाईक) स्वारांचे होत आहेत. त्यातही मृत्युचे प्रमाण ८० टक्के असल्याची बाब वाहतूक शाखेच्या निदर्शनास आली. बाईकस्वारांचे अपघाती मृत्यु टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर होणे ही बाब अत्यंत महत्वाची आहे. त्याबाबत जनजागृती बरोबर कायदेशीर कारवाई देखिल आवश्यक आहे. तसेच मोटारकार वाहनांच्याअपघातामध्येही सीटबेल्टचा वापर न केल्याने सुरक्षेसाठी असलेल्या वाहनांमधील एअरबॅग न उघडल्याने गंभीर किंवा प्राणांतिक अपघात झाल्याचीही बाब निदर्शनास आली आहे. ॅहीच बाब लक्षात घेऊन अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी विना हेल्मेट दुचाकी चालविणाºया तसेच मोटारकारमध्ये सीटबेल्ट न लावणाºयांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर १८, १९ आणि २१ जून या तीन दिवसांच्या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील १८ वाहतुक उपविभागामार्फत एक हजार ८८९ दुचाकी चालकांवर कारवाई करुन प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे तब्बल नऊ लाख ३४ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर सीटबेल्ट न लावताच वाहन चालविणाºया ८४३ चालकांकडून एक लाख ६८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहीमेमध्ये एकूण ११ लाख तीन हजारांचा दंड वसूल केला. आपल्या स्वत:च्या तसेच सहप्रवाशांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.