शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

अंबरनाथ केमिकल कंपनीतील स्फोटात एका कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2023 6:01 PM

 स्फोटात कंपनीतील एक कामगार मृत्युमुखी पडला असून इतर कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

अंबरनाथ: अंबरनाथ पश्चिमेकडील वडोल गाव एमआयडीसी क्षेत्रामध्ये ब्ल्यूजेट हेल्थ केअर लिमिटेड या रासायनिक कारखान्यांमध्ये आज दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीतून मोठ्या प्रमाणात विषारी व्हायची गळती सुरू झाली आहे.  स्फोटात कंपनीतील एक कामगार मृत्युमुखी पडला असून इतर कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.    आज दुपारी अंबरनाथच्या वडोलगाव एमआयडीसी क्षेत्रात एका कंपनीला भीषण स्फोट झाला. या कंपनीत एकूण पाच केमिकल प्लांट असून त्यापैकी दोन नंबरच्या प्लांटमध्ये हा भीषण  स्फोट घडला. त्यानंतर या प्लांटमध्ये आग देखील लागली होती. आग क्षणार्धात विझली असली तरी या स्फोटामुळे कंपनीत असलेल्या केमिकल टाक्यांना गळती लागली आहे. कंपनीत असलेला मोठ्या रासायनिक टँक मधून नायट्रिक ऍसिडची गळती सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास जाणवत आहे.     अंबरनाथ अग्निशामक दल, एमआयडीसी अग्निशामक दल, आणि कंपनीतील कामगार एकत्रितपणे ही वायू गळती रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान कंपनीचा झालेला स्फोटात सूर्यकांत झिमान हा कामगार जागीच मृत्यूमुखी पडला असून इतर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या जखमेवर उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :ambernathअंबरनाथ