भिवंडी - ऑनलाईन शिक्षण हे सर्वदूर सर्व विद्यार्थ्यांपर्यन्त पोहचू शकत नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण ही धूळफेक असल्याचे मत राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी मंगळवारी भिवंडीत व्यक्त केले . भिवंडी पोलीस संकुल येथे आयोजित भिवंडी तालुका स्तरीय बैठकी दरम्यान तेे बोलत होते .या बैठकीस आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आर एच किल्लेदार ,उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर ,महानगरपालिका आयुक्त डॉ पंकज आशिया ,तहसीलदार शशिकांत गायकवाड ,पोलीस उपअधीक्षक दिलीप गोडबोले, गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते . ऑनलाईन शिक्षण जर सर्वां पर्यंत पोहचत असते तर अमेरिका शक्तिशाली राष्ट्राला शाळा सुरू करण्याची गरज भासली नसती अशी कोपरखळी मारत विवेक पंडित यांनी महसूल ,पुरवठा ,शिक्षण ,सार्वजनिक आरोग्य ,महिला व बाल कल्याण ,वन , वीज ,रोजगार हमी योजना या विभागांची झाडाझडती घेत त्यांच्या कडील समस्या जाणून घेतानाच करावयाच्या उपाययोजना या बाबत मार्गदर्शन केले. आज ही पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत तर ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क समस्या असल्याने शासन किती ही म्हणत असलं तरी असंख्य विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहत असल्या बद्दल खंत व्यक्त करीत , कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांना सकस पौष्टिक आहार पोहचविण्याची जबाबदारी असून प्रत्येक कामाच्या ठिकाणी उलट तपासणी झाल्यास आपल्या कामातील उणीव दिसून आल्यास त्याच्या निराकरणा साठी मदत होऊ शकते असे स्पष्ट करीत, पुरवठा विभाग कडून आदिवासी कुटुंबा पर्यंत शासनाच्या मोफत व अल्प दरातील धान्य पोहचविण्याची जबाबदारी असून त्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी दिले आहे. या बैठकी दरम्यान प्रलंबित वन हक्के दावे निकाली काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर पुढाकार घेण्या बाबत सूचना देत यासाठी समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचे आवाहन केले .या बैठकीस सर्व विभागातील अधिकारी , श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'ऑनलाईन शिक्षण म्हणजे धूळफेक, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाची गरज'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 7:15 PM
ऑनलाईन शिक्षण जर सर्वां पर्यंत पोहचत असते तर अमेरिका शक्तिशाली राष्ट्राला शाळा सुरू करण्याची गरज भासली नसती अशी कोपरखळी मारत विवेक पंडित यांनी मार्गदर्शन केलं.
ठळक मुद्देऑनलाईन शिक्षण जर सर्वां पर्यंत पोहचत असते तर अमेरिका शक्तिशाली राष्ट्राला शाळा सुरू करण्याची गरज भासली नसती अशी कोपरखळी मारत विवेक पंडित यांनी मार्गदर्शन केलं.