सदानंद नाईक, उल्हासनगर : व्हाट्सअपद्वारे ट्रेडिंगचे आमिष दाखवून २३ जानेवारी ते १३ मार्च दरम्यान नीरज अभ्यंकर यांना ५९ लाख ३८ हजार ४५६ रुपयाने ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-४, सुभाष टेकडी परिसरात राहणारे नीरज प्रल्हाद अभ्यंकर यांना मोबाईल व्हाट्सअपवर अज्ञातांनी वेगवेगळ्या दोन मोबाईल नंबरवर अभ्यंकर यांच्या सोबत संभाषण करून त्यांना ट्रेडिंगचे आमिष दाखविण्यात आले. एन्जल वन कंपनीच्या नावे अभ्यंकर यांच्या नावाने खोटे ऑनलाईन अँजल वन इन्स्टिट्यूशन अकाउंट बनवून अभ्यंकर यांना ट्रेडिंगसाठी वेगवेगळ्या बँक खात्यात २३ जानेवारी २०१३ ते १३ मार्च २०२४ दरम्यान आयपीओ मध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. अभ्यंकर यांनी तब्बल ५९ लाख ३८ लाख ४५६ रुपये भरले आहे.
दरम्यान आपलीं फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार पोलिसांना कथन केला. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात मोबाइलधारक इसम, सेंटर अँलई एंटरप्राइज व एम के इंदूस्ट्रीस यांच्या विरोधात ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.