ऑनलाईन रमी गेमच्या वाढत्या आमिषाने झटपट पैसा मिळेल याभावनेने सद्या अनेक बेरोजगार तरुण या गेमकडे आकर्षित होत आहेत. खर्डी येथील एका तरुणाने रमी गेममुळे नातेवाईकाकडून घेतलेल्या लाखो रुपयांच्या कर्जाच्या तगाद्यामुळे राहत्या घरी विष घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी खर्डी पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार देवा जाधव तपास करीत आहेत. उत्तर प्रदेश येथील चंदन अमृतालाल बिंद( 27) हा गेल्या 7/8 महिन्यापासून कामधंद्या निमित्ताने खर्डी येथे त्याच्या नातेवाईकांकडे रहात होता. चंदन ला ऑनलाइन रमी गेमच आकर्षण असल्याने त्याला झटपट श्रीमंत व्हायच होत,त्याच्या ह्या रमी गेम खेळण्याच्या नादात चंदन ने उत्तरप्रदेश व इतर ठिकाणी असलेल्या नातेवाईक, मित्रमंडळी कडून 7 ते 7.50लाख रुपयांचे कर्ज घेतले होते पण त्याला ह्या गेम मध्ये यश न आल्याने व नातेवाईक/मित्रमंडळीनी त्यांचे पैसे मागण्याचा ससेमिरा लावल्याने अखेर त्याने 25 जुलै दुपारी खर्डी येथे नातेवाईकांच्या घरात विष पिला व उत्तरप्रदेश मध्ये राहणाऱ्या वडिलांना फोन करून कर्ज झाल्याने मी विष पिलो असल्याचे सांगितले होते. वडिलांनी चंदनला दवाखान्यात नेण्यासाठी खर्डी येथील नातेवाईकांना सांगितले पण त्यावर शासकीय दवाखान्यात उपचार करतांना त्याची प्राणज्योत मावळली.याप्रकरणी पोलीस हवालदार देवा जाधव तपास करीत आहेत.ऑनलाईन गेमिंग सह बिंगो चे वाढते थैमान
दरम्यान ऑनलाईन गेमिंग च्या टीव्ही चॅनेल वर होणाऱ्या जाहिराती व त्या जाहिराती करणारे स्टार क्रिकेटर, यांच्या अमिष दाखवणाऱ्या जाहिराती मुळे तरुण पिढी ऑनलाईन गेमिंग च्या जास्त् आहारी गेली असून अनेकांनी कर्जबाजारी मुळे आपले जीवन संपवले असल्याचे दिसून येत आहे या ऑनलाईन गेमिंग पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात बिंगो या सारखे विडिओ गेम ची जुगार सर्वत्र पाहायला मिळत आहे जिल्ह्यात किमान 100 हून अधिक बिंगो चे अवैध सेन्टर सध्या सुरु आहेत.