शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

ढोलताशा पथकांनी धरली परतीची वाट, अवघा ३५ ते ४० टक्केच व्यवसाय झाल्याने बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 3:08 AM

गणेशोत्सवात वाजंत्री करून चार पैसे मिळतील, या आशेने राज्यभरातील शेतमजुरी, मोलमजुरी करणारे मुंबई, ठाणे उपनगरांत दाखल होतात.

- जान्हवी मोर्येडोंबिवली : गणेशोत्सवात वाजंत्री करून चार पैसे मिळतील, या आशेने राज्यभरातील शेतमजुरी, मोलमजुरी करणारे मुंबई, ठाणे उपनगरांत दाखल होतात. अनेक गणेशभक्तही आपल्या लाडक्या बाप्पाला ढोलताशांच्या गजरात निरोप देण्यासाठी त्यांना वाजंत्रीच्या कामाच्या आॅर्डर देतात. यंदाही डोंबिवलीत ५०० वाजंत्री दाखल झाले होते. मात्र, यंदा व्यवसाय तेजीत नसल्याने अंदाजे ३०० पथकांनी परतीची वाट धरली आहे. यंदाच्या वर्षी ३५ ते ४० टक्केच व्यवसाय झाल्याचे एका पथकाचे प्रमुख भारत पाटोळे यांनी सांगितले.पाटोळे म्हणाले, ‘बुलडाणा जिल्ह्यातून अंदाजे ६० पथके डोंबिवलीत आली आहेत. मागील १० वर्षांपासून आम्ही गणेशोत्सवात येथे येतो. या दिवसांत गावी फार कामे नसतात. यंदा ढोलताशा वाजवून चांगली कमाई होईल, असे वाटत होते. परंतु, गेल्या काही वर्षांत या आशा फोल ठरत आहे. मागील वर्षी पावसामुळे व्यवसाय कमी झाला होता. तरीदेखील, ५० टक्के ग्राहकांकडून आॅर्डर मिळाल्या होत्या. परंतु, यंदा त्याहीपेक्षा कमी व्यवसाय झाला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी यंदा मानधनही कमी केले आहे. मागील वर्षी एक तासाला तीन हजार रुपये मिळाले होते. यंदा दोन हजार रुपये मिळाले आहेत. दीड, पाच, सात आणि अनंत चतुर्दशीला गणेशाला निरोप दिला जात असल्याने त्या दिवसापुरते काम मिळते. त्यानंतरचे दिवस बसून काढावे लागतात. एका पथकात चार माणसे ढोलताशा वाजवण्यासाठी जातात. ढोलताशांकडे हळूहळू लोकांचा कल कमी होत असल्याचे दिसून येत आहे.’बुलडाण्यामध्ये सर्व गणपतींचे अनंत चतुर्दशीला विसर्जन होते. मागील सात दिवसांत चांगला व्यवसाय न झाल्याने आता गावाकडे तरी थोडीफार कमाई होईल, या आशेने अनेक पथकांनी परतीची वाट धरली. गणेशोत्सवानंतर मजुरी करून या पथकांतील सर्वजण आपली दिनचर्या चालवतात. यंदा शहरात व्यवसाय चांगला झाला नाही. एका माणसाला दिवसभरात २०० रुपये खर्च येतो. ग्राहक आले तरी घासाघीस करतात. त्यामुळे दीड हजारात एक आॅर्डर घेतो. काही नाही त्यापेक्षा किमान जेवण व प्रवासाचा खर्च तरी निघावा, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कमी दरात आॅर्डर घेतल्या जातात. त्यामुळे गावी जाईपर्यंत दोन हजार रुपये हातात उरतात, असे पाटोळे यांनी सांगितले.दुकानाबाहेरच काढतात रात्रवाजंत्रीकामासाठी डोंबिवलीतील चाररस्ता परिसरात दरवर्षी राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून मंडळी येतात. यंदाही मलकापूर, राहुरी, शेगाव, नांदुरा, अकोला, खामगाव येथून वाजंत्री आले होते.राहण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना दुकानाबाहेरच्या जागेत भटक्या कुत्र्यांसोबत झोप काढावी लागत आहे. त्यांच्या व्यवस्थेसाठी कुणी पुढे येत नाही.सरकारने त्यांची दखल घेतली जावी, अशी अपेक्षा या मंडळींची आहे. ग्रामीण भागातील शेतकरी शेती चांगली होत नाही, म्हणून आधीच त्रस्त आहे. त्याला वाजंत्रीकामातून काही दोन पैशांची अपेक्षा होती. ती देखील फोल ठरली आहे. अशा परिस्थितीत वाजंत्री काम करणाऱ्यांचा वाली कोण, असा सवालही त्यांनी केला आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८newsबातम्या