ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण फार कमी झाले आहे. सोमवारी फक्त ५१३ रुग्ण सापडले असून १६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आता दोन लाख १२ हजार ६४६ रुग्ण संख्या झाली असून पाच हजार ३७१ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिली आहे. ठाणे शहरात १५६ नवे रुग्ण सापडले आहेत. यासह शहरात ४६ हजार ९९८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार १५८ झाली आहे. कल्याण - डोंबिवली परिसरात ८८ रुग्ण नव्याने आढळून आले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता ५० हजार २८२ रुग्ण बाधीत असून एक हजार सात मृत्यू झाले आहेत.
उल्हासनगरमध्ये आठ रुग्ण आढळले आणि एकाचा मृत्यू झाला आहे. आता या शहरात आता दहा हजार २५९ रुग्ण बाधीत झाल्याचे नोंदले असून मृत्यू संख्या ३४० झाली आहे. भिवंडी मनपा. परिसरात पाच रुग्ण नव्याने सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. येथे पाच हजार ९२४ बाधीतांची तर, ३३५ मृतांची नोंद झाली आहे. मीरा भाईंदर शहरात ५९ नवे रुग्णं आणि दोन मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. या शहरात आता २२ हजार ७३६ बाधितांसह ७२३ मृतांची नोंद झाली आहे. अंबरनाथ शहरात २२ रुग्णांचा नव्याने शोध लागला आहे. तर, एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आता सात हजार ३५४ बाधितांसह मृतांची संख्या २६९ नोंदवण्यात आली आहे. बदलापूर परिसरामध्ये २० रुग्ण आज सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण सात हजार ३९४ झाले आहेत. आज एकही मृत्यू झाला नसल्याने मृत्यूची संख्या ९८ आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या गांवपाड्यांमध्ये ३१ रुग्णांचा आज शोध लागला असून तीन मृत्यू झाले आहे. या गांवपाड्यांत आतापर्यंत १६ हजार ९०९ बाधीत झाले असून ५३३ जणांचा मृत्यू झाला आहे.