ठाणे : जिल्ह्यात केवळ ९५३ नवे रुग्ण गुरुवारी सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख दहा हजार ९६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आज २५ मृत्यू झाल्यामुळे आता जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ३०१ झाली आहे.
ठाणे शहरात ३३६ रुग्ण आज आढळून आले आहेत. आता या शहरात ४७ हजार २८५ बाधीत रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे एक हजार १४५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर कल्याण - डोंबिवली परिसरात १५९ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत ४९ हजार ७७७ बाधीत झाले. तर, एक हजार मृतांची नोंद करण्यात आली आहे.
उल्हासनगर परिसरात २४ बाधितांसह एकाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत बाधीत रुग्ण दहा हजार १९३ झाले आहे. तरी, आजपर्यंत ३३६ मृत्यू झाले आहेत. भिवंडीला २५ बधीत आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. आता बाधीत पाच हजार ८८५ असून मृतांची संख्या ३२४ आहे. मीरा भाईंदरमध्ये ९५ रुग्णांची, तर, चार मृत्यूची नोंद आज झाली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या २२ हजार ४१६ झाली असून मृतांची संख्या ७०९ वर गेली आहे.
अंबरनाथमध्ये ३० रुग्णांची नव्याने वाढ. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या सात हजार २६४ झाली आहे. तर, मृतांची संख्या २६४ झाली आहे. बदलापूरमध्ये २५ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत सात हजार ३२० झाली आहे. या शहरात आजही मृत्यू नाही. आतापर्यंत ९७ ही मृत्यूची संख्या कायम आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात ८७ रुग्णांची वाढ झाली आणि आठ मृत्यू झाले आहेत. आता बाधीत १६ हजार ७३४ आणि मृत्यू ५२४ झाले आहेत.