शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

राष्ट्रवादीतील स्टंट श्रेष्ठींवर दबावापुरताच

By admin | Published: January 14, 2016 3:29 AM

बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येवरून अडचणीत आलेल्या एका नेत्याच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाने ‘गुन्ह्यातून वाचवा, नाहीतर पक्षांतर करतो,’ अशी भूमिका घेत

ठाणे : बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येवरून अडचणीत आलेल्या एका नेत्याच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाने ‘गुन्ह्यातून वाचवा, नाहीतर पक्षांतर करतो,’ अशी भूमिका घेत वरिष्ठांवर दबावाची खेळी खेळल्याचे आता स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे येणार असल्याचे ठाऊक असल्यानेच त्यापूर्र्वी दोन दिवस अगोदर वातावरण तयार करून पद्धतशीरपणे येऊरला बैठक घेऊन ही मोहीम आखण्यात आली आणि तटकरेंच्याच बैठकीवर बहिष्कार टाकून पक्षातील खदखद किती तीव्र आहे, याची त्यांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न झाला. परमार आत्महत्या प्रकरणातून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने आर्थिक व्यवहारांत नावे आल्याने आणि एका गटाच्या दोन नगरसेवकांना थेट तुरुंगात जावे लागल्याने पक्षातील एका गटाच्या राजकीय अस्तित्वालाच नख लागले. पुढच्या वर्षी होणाऱ्या ठाणे पालिकेच्या निवडणुकीत याचा सणसणीत फटका बसेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिकीटवाटपातील आपला वरचष्मा कमी होईल. पक्षात यापुढे आपला शब्द अंतिम नसेल, असे अनेक धोके लक्षात आल्याने पक्षश्रेष्ठींवर केवळ दबाव टाकण्यासाठीच हा स्टंट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आमदार निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ठाण्यात येणार, याची कुणकुण या गटाला आधीच होती. त्यामुळेच त्यांनी बंडाचा हा खटाटोप करत वरिष्ठांना इशारा देत स्थानिक राजकारणातील हिशेबही चुकते केल्याचे अन्य नेत्यांचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपात जाण्याचा दावा या नगरसेवकांकडून करण्यात आला असला, तरी भाजपाच्या ठाण्यातील एकाही नेत्याने आमंत्रणच दिले नसल्याने तीदेखील याच स्टंटची एक खेळी असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. जाहीर भूमिकेमुळे नाराजीपरमार प्रकरणात सध्या विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला हे जामिनासाठी झगडत आहेत. पक्षातील काही नेत्यांवर यापेक्षा तीव्र आरोप झाले, पण त्यात पक्ष त्यांच्या पाठीशी राहिल्याचे दाखले देत आम्हाला वाऱ्यावर सोडल्याची भावना जाहीररीत्या मांडत ‘आरोपांतून सोडवा,’ अशी मागणी नगरसेवकांनी जाहीररीत्या केल्याने प्रदेशपातळीवरील अनेक नेत्यांनी नापसंती व्यक्त केली. अशा प्रकरणांत पाठीशी राहण्याची पद्धत वेगळी असते. ती भूमिका जाहीरपणे घेता येत नाही. त्यामुळे घायकुतीला न येता थोडे धीराने, संयमाने आणि समंजसपणे हा विषय हाताळायला हवा होता. तो अचानकपणे वृत्तपत्रांतून चर्चेला आल्याने प्रदेशपातळीवरील अनेक नेते नाराज झाल्याचे सांगण्यात आले. चर्चेची दारे बंद : तटकरे हे मंगळवारी ठाण्यात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने आले होते. तेव्हा चर्चा करून विषय समजून घेण्यासाठी एवढे टोकाचे पाऊल लगेच का उचलले जात आहे. त्याला थेट प्रसिद्धिमाध्यमांतून तोंड का फोडले जात आहे, यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक बोलावली. ती बैठकही पूर्वनियोजित होती, परंतु या गटाने चर्चेची दारे बंद करत २४ नगरसेवकांना त्यावर बहिष्कार टाकायला लावला. त्यामुळे तटकरे यांच्यावर दबाव टाकण्यात हा गट प्रबळ ठरल्याची चर्चा रंगवण्यात आली. परंतु, अवघ्या एका दिवसातच त्यांची ही खेळी उघड झाली.भाजपामधून तीव्र विरोध : विशेष म्हणजे जामिनासाठी झगडत असलेल्या नगरसेवकांना न्याय मिळाला नाही, तर आम्ही भाजपात जाऊ, असा धमकीवजा इशारा या नगरसेवकांनी दिला. परंतु, भाजपामधील वरिष्ठ पातळीवरील एक नेत्याचे या गटातील बड्या नेत्याशी वितुष्ट असल्याने स्थानिक पातळीवरील नेते मंडळीदेखील या नगरसेवकांना आपल्या कळपात सामील करून घेण्यास तितकीशी उत्सुक नसल्याचे दिसते. हीच मंडळी उद्या आम्हाला डोईजड होईल. त्यांची सारी कृत्ये आम्हाला निस्तरावी लागतील. त्यामुळे त्यांना सामावून घेण्यासाठी भाजपामधील कोणीही फारसा रस दाखविलेला नाही. त्यातूनच बंडोबा झपाट्याने थंडोबा झाल्याचे बोलले जाते. राजकीय वजन वाढवण्यासाठी...ठाणे शहर राष्ट्रवादीच्या एका गटाने वरिष्ठांवर दबावासाठी दोन दिवसांपासून या खेळीची आखणी केली तसेच तटकरे यांना आपल्या गटाची ताकद दाखविण्याचा केलेला प्रयत्नही लपून राहिला नाही. या गटाच्या हालचालीमागे असलेल्या नेत्याचे नाव काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घेतल्याने राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याकडे काणाडोळा करण्यास सुरुवात केली होती. त्यातून त्यांचे ठाण्यातील राजकीय वजन घटण्याची चिन्हे दिसू लागली. म्हणूनच, आपल्या निकटवर्ती नगरसेवकांना हाताशी धरून त्यांनी श्रेष्ठींची वारंवार भेट घेण्याचा प्रयत्न केला. तसेच चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांचे हे प्रयत्न असफल झाल्यानेच त्यांनी दबाव वाढवत बंडाचा-बहिष्काराचा मार्ग स्वीकारल्याचे बोलले जाते.जाहीर भूमिकेमुळे नाराजीपरमार प्रकरणात सध्या विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला हे जामिनासाठी झगडत आहेत. पक्षातील काही नेत्यांवर यापेक्षा तीव्र आरोप झाले, पण त्यात पक्ष त्यांच्या पाठीशी राहिल्याचे दाखले देत आम्हाला वाऱ्यावर सोडल्याची भावना जाहीररीत्या मांडत ‘आरोपांतून सोडवा,’ अशी मागणी नगरसेवकांनी जाहीररीत्या केल्याने प्रदेशपातळीवरील अनेक नेत्यांनी नापसंती व्यक्त केली. अशा प्रकरणांत पाठीशी राहण्याची पद्धत वेगळी असते. ती भूमिका जाहीरपणे घेता येत नाही. त्यामुळे घायकुतीला न येता थोडे धीराने, संयमाने आणि समंजसपणे हा विषय हाताळायला हवा होता. तो अचानकपणे वृत्तपत्रांतून चर्चेला आल्याने प्रदेशपातळीवरील अनेक नेते नाराज झाल्याचे सांगण्यात आले. चर्चेची दारे बंद : तटकरे हे मंगळवारी ठाण्यात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने आले होते. तेव्हा चर्चा करून विषय समजून घेण्यासाठी एवढे टोकाचे पाऊल लगेच का उचलले जात आहे. त्याला थेट प्रसिद्धिमाध्यमांतून तोंड का फोडले जात आहे, यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक बोलावली. ती बैठकही पूर्वनियोजित होती, परंतु या गटाने चर्चेची दारे बंद करत २४ नगरसेवकांना त्यावर बहिष्कार टाकायला लावला. त्यामुळे तटकरे यांच्यावर दबाव टाकण्यात हा गट प्रबळ ठरल्याची चर्चा रंगवण्यात आली. परंतु, अवघ्या एका दिवसातच त्यांची ही खेळी उघड झाली.भाजपामधून तीव्र विरोध : विशेष म्हणजे जामिनासाठी झगडत असलेल्या नगरसेवकांना न्याय मिळाला नाही, तर आम्ही भाजपात जाऊ, असा धमकीवजा इशारा या नगरसेवकांनी दिला. परंतु, भाजपामधील वरिष्ठ पातळीवरील एक नेत्याचे या गटातील बड्या नेत्याशी वितुष्ट असल्याने स्थानिक पातळीवरील नेते मंडळीदेखील या नगरसेवकांना आपल्या कळपात सामील करून घेण्यास तितकीशी उत्सुक नसल्याचे दिसते. हीच मंडळी उद्या आम्हाला डोईजड होईल. त्यांची सारी कृत्ये आम्हाला निस्तरावी लागतील. त्यामुळे त्यांना सामावून घेण्यासाठी भाजपामधील कोणीही फारसा रस दाखविलेला नाही. त्यातूनच बंडोबा झपाट्याने थंडोबा झाल्याचे बोलले जाते. राजकीय वजन वाढवण्यासाठी...ठाणे शहर राष्ट्रवादीच्या एका गटाने वरिष्ठांवर दबावासाठी दोन दिवसांपासून या खेळीची आखणी केली तसेच तटकरे यांना आपल्या गटाची ताकद दाखविण्याचा केलेला प्रयत्नही लपून राहिला नाही. या गटाच्या हालचालीमागे असलेल्या नेत्याचे नाव काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घेतल्याने राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याकडे काणाडोळा करण्यास सुरुवात केली होती. त्यातून त्यांचे ठाण्यातील राजकीय वजन घटण्याची चिन्हे दिसू लागली. म्हणूनच, आपल्या निकटवर्ती नगरसेवकांना हाताशी धरून त्यांनी श्रेष्ठींची वारंवार भेट घेण्याचा प्रयत्न केला. तसेच चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांचे हे प्रयत्न असफल झाल्यानेच त्यांनी दबाव वाढवत बंडाचा-बहिष्काराचा मार्ग स्वीकारल्याचे बोलले जाते.परमार प्रकरणात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर झालेली कारवाई व एका नेत्यावरील कारवाईची टांगती तलवार या संकटाच्या काळात पक्षाची साथ नसल्याने सुरू झालेले बंडाचे वारे रोखण्याकरिता नाराजांना चुचकारण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केला. आपल्यापाठी पक्ष खंबीरपणे उभा आहे हा संदेश देणे गरजेचे आहे, असे त्यांनी या बैठकीत काढले. ठाण्यातील आपल्या लोकांशी बोलून अडचणीच्या काळात पक्ष व नेते त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत हा संदेश त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. योग्य-अयोग्य याचा निवाडा योग्यवेळी न्यायालयात होईल. परंतु संवाद हवा. ठाण्यातील नगरसेवकाची अटक व एका नेत्याची कोंडी या विषयावर पवारांनी अशी जाहीर भूमिका घेतल्यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत आपण पवार यांच्याशी खाजगीत चर्चा करु, असे जाहीर करून पडदा पाडला. साधी चर्चाही नाही : केळकरभाजपामध्ये येण्यास अनेक जण उत्सुक आहेत. परंतु, आताच पेपर फोडून काही उपयोग नाही. असे असले तरी सध्या राष्ट्रवादीच्या एकाही नगरसेवकाने आमच्या पक्षाशी अथवा कोण्त्याही नेत्याशी पक्षात प्रवेश करण्याबाबत चर्चा केलेली नाही.- संजय केळकर, भाजपा, शहराध्यक्ष आणि आमदार